शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 09:52 IST

Bhai Dooj 2024: यंदा ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे, त्यानिमित्त भावाने बहिणीला ओवाळणी देण्याची प्रथा यमराजाने कशी सुरु करून दिली ते पाहू!

यमद्वितीया अर्थात भाऊबीज (Bhai Dooj 2024). या दिवशी यमराज दिवाळीनिमित्त आपल्या बहिणीकडे म्हणजे यमुनेकडे जेवावयास गेले होते. यमुनेने  त्याचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले आणि यमराजाकडे ओवाळणीदेखील मागितली. काय होती ओवाळणी? चला पाहू.

वास्तविक यमराज दाराशी येणार, ही कल्पनासुद्धा आपल्याला सहन होणार नाही. परंतु यमराजाच्या येण्याने त्याची बहीण आनंदून गेली आहे. कारण, दिवस रात्र या मृत्यूलोकीचा कारभार सांभाळणारा आपला भाऊ, कधी नव्हे ते जेवायला आपल्याकडे आला आहे. माहेरची माणसे आली की मुली मोहरून जातात. यमुनासुद्धा त्याला अपवाद नव्हती. म्हणून यमराजाला आवडेल असा पाहुणचार तिने केला. त्याच्या कामाचे कौतुक केले. त्याच्या कर्तव्यदक्षपणामुळे सृष्टीचे चक्र, यम-नियम सुरळीत सुरू आहेत, असे ती म्हणाली. तिच्या कौतुकाच्या प्रेमभरल्या शब्दांनी यमराज भावूक झाले आणि तिला ओवाळणी काय देऊ असे विचारते झाले.

यावर यमुना म्हणाली, 'दादा, मी जे मागेन ते खरोखरच मला देशील का?'यमराज म्हणाले, 'माझ्या आवाक्यात असेल तर नक्कीच देईन!'सारासार विचार करून यमुना म्हणाली, 'दादा, तुझ्या येण्याने जसा मला आनंद झाला, तशी प्रत्येक बहीण आपल्या भावाची वाट बघत असते. त्यामुळे निदान आजच्या दिवशी तरी भावा बहिणीची ताटातूट होणार नाही, याची काळजी घेशील का? हीच माझी ओवाळणी समजेन मी...!'

यमराज म्हणाले, 'आम्हालातरी हे काम करताना कुठे आनंद होतो. परंतु जन्म-मृत्यू यामुळे जग सुरळीत सुरू आहे. अन्यथा लोक एकमेकांच्या जीवावर उठतील. मृत्यूच्या भयामुळे मनुष्य नियमांचे पालन करतो. अन्यथा तो बेबंधपणे वागेल. म्हणून त्याला दिलेल्या कालावधीत त्याने चांगले आयुष्य जगले पाहिजे. मृत्यूचा क्षण त्यांना माहित नसला, तरी आमच्याकडे सगळीच नोंद असते आणि आमचे काम आम्हाला वेळेत करावेच लागते. यासाठीच तर कृतज्ञता म्हणून लोक धनत्रयोदशीला आमच्या मार्गात म्हणजे दक्षिण दिशेला सायंकाळी यमदीपदान करतात. परंतु तुझी मागणी रास्त आहे. यासाठी मी माझ्या परिने आजच्या दिवशी त्यांचा वियोग होणार नाही, यादृष्टीने नक्की प्रयत्न करीन. मात्र, जे आपणहून नियमांचे उल्लंघन करतील, त्यांना माझ्या दरबारात हजेरी लावावी लागेल. त्याला माझा नाईलाज आहे.'

यमराजाचे बोलणे ऐकून यमुना आनंदून गेली व त्यांच्या या भेटीचा दिवस बहीण भावाच्या नात्याला समर्पित ठरवून भाऊबीज म्हणून साजरा होऊ लागला. तेव्हापासून आजच्या दिवशी भावाने बहीणीच्या घरी जेवायला जाण्याची प्रथा आहे व बहीण भावाच्या नात्याआड न येण्याचे वचन यमराज पाळत आहेत. आहे की नाही सुंदर ओवाळणी?

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधी