शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

'धीर धरा...हे ही दिवस जातील'; वाचा दोन शेतकऱ्यांच्या यशापयशाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 08:00 IST

कितीही कठीण परिस्थिती असली, तरी संयम ठेवा! आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि त्याबरोबर तुमची मनस्थितीदेखील!

आपण सतत दुसऱ्यांकडे पाहून दु:खी होत असतो. आपल्या आनंदाची तुलना त्यांच्याशी करत राहतो. त्यामुळे होते असे, की जे आपल्याकडे आहे, त्याकडे आपले लक्षच जात नाही आणि नुकसान आपलेच होत राहते. आता या दोन शेतकऱ्यांचीच गोष्ट बघा ना!

एका गावात सामान्य जीवन जगणारे दोन शेतकरी होते. एक समाधानी होता तर दुसरा असमाधानी. गेल्या काही काळात त्या गावातल्या काही शेतकऱ्यांना आपल्या शेतात हिरे आणि मौल्यवान रत्ने सापडली. ते रातोरात श्रीमंत झाले. ते पाहून असमाधानी शेतकऱ्यानेसुद्धा नशीब आजमवायचहे ठरवले. त्यानेही प्रयत्न करून पाहिला इथवर ठीक आहे. परंतु त्याने अपयशाने खचून आत्महत्या केली. 

याउलट दुसरा शेतकरी आपले काम प्रामाणिकपणे करत राहिला. हिरे, मौल्यवान रत्ने यांची स्वप्न बघण्याऐवजी काळ्या मातीत सोन्यासारखे धान्य पिकवत होता. एक दिवस त्याला शेतात आकर्षक दगड दिसला. त्याने कौतुकाने तो घरी आणला. मुलांनाही मजा वाटली. बायकोने तो श्रद्धेने कपाळी लावून देवघरात ठेवला.

एक दिवस त्याचा मित्र शहरातून आला. त्याच्या घरी उतरला. तेव्हा त्याची दृष्टी देवघरात गेली. तो म्हणाला, हे मुल्यवान रत्न तू खुलेआम ठेवले आहेस, तुला भीती नाही वाटली?

यावर शेतकरी म्हणाला, ते रत्न आहे हेच मला माहित नव्हते. मला तो आकर्षक वाटला म्हणून घरी आणला. बायकोने देव्हाऱ्यात ठेवला, एवढेच!मित्र म्हणाला, तुझ्या शेतजमीनीची पाहणी करायला हवी. शेतकऱ्याने होकार दिला आणि खोदकामात त्या शेतातून मुल्यवान रत्नांची खाण निघाली. शेतकऱ्याचे दिवस पालटले. तो समाधानी होताच, आता आनंदाने वैभव उपभोगू लागला. त्यावेळेस त्याला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची आठवण आली. त्यानेही स्वत:वर आणि दैवावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज परिस्थिती त्याचीही बदलली असती.

म्हणून कितीही कठीण परिस्थिती असली, तरी संयम ठेवा! आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि त्याबरोबर तुमची मनस्थितीदेखील!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी