शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 21:02 IST

Ayodhya Ram Mandir News: आता अयोध्येत गेल्यावर केवळ राम दर्शन नाही, तर श्रीरामांचा दरबारही पाहता येणार आहे.

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना गतवर्षी करण्यात आली होती. त्यानंतर ०५ जून २०२५ रोजी राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम दरबाराची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. परंतु, श्रीरामांचा दरबार भाविकांना दर्शनासाठी खुला होणार का, याबाबत तेव्हा स्पष्टता नव्हती. आता मात्र याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. आता अयोध्येत गेल्यावर केवळ रामललाचे दर्शन नाही, तर श्रीरामांचा दरबारही पाहता येणार आहे. 

श्रीराम जन्मभूमीवर नव्याने बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या राजदरबारामध्ये श्रीराम विराजमान झाले. पहिल्या मजल्याचे काम सुरू झाल्यानंतर त्यामध्ये राम दरबार स्थापपन करण्यात आला आहे. तसेच त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यासह मंदिराच्या मुख्य कळसाचे काम पूर्ण झाले आहे. राम जन्मभूमीचे हे मुख्य शिखर सुवर्णजडित आहे. त्याचीही विधिवत स्थापना आणि पूजन करण्यात आले. राम मंदिरामध्ये २१ मूर्तींची स्थापना करण्यात आली. ईशान्य कोपऱ्यामध्ये शिवलिंग, अग्निकोनामध्ये श्रीगणेश, दक्षिण मध्य भागात महाबली हनुमान, नैऋत्य दिशेला सूर्यदेवता, वायव्येला माता भगवती, उत्तर मध्यमध्ये माता अन्नपूर्णा, मुख्य मंदिरातील पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार, तर दक्षिण पश्चिमेला शेषावतार मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर आता भाविकांना श्रीरामांचा दरबार पाहता येणार आहे. 

संपूर्ण राम दरबार पर्यटकांना, भाविकांना सुलभपणे पाहता येऊ शकेल

श्रीराम दरबाराच्या दर्शनाची सुविधा व्यवस्थित आणि सुरळीत करण्यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्टने एका दिवसांत सहा स्लॉट उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक स्लॉटमध्ये जास्तीत जास्त ३०० भाविक दर्शन घेऊ शकतील. प्रत्येक स्लॉटसाठी वेळ दोन तास ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्लॉटमध्ये एकूण ३०० पास दिले जाणार आहेत. हे पास जिल्हा प्रशासन आणि राम मंदिर ट्रस्ट या दोन संस्थांमध्ये विभागले गेले आहेत. दोघांनाही प्रत्येक स्लॉटसाठी १५०-१५० पास देण्यात आले आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे शरद शर्मा म्हणाले की, भाविकांना चांगला अनुभव देण्याच्या उद्देशाने ही स्लॉट आणि पासची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण राम दरबार पर्यटकांना, भाविकांना सुलभपणे पाहता येऊ शकेल.

दरम्यान, सकाळी ९ वाजल्यापासून श्रीराम दरबाराचे दर्शन सुरू होणार आहे. रात्रौ ९ वाजेपर्यंत श्रीराम दरबाराचे दर्शन घेता येणार आहे. या राम दरबारात राजा श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे दर्शन घेता येणार आहे.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश