Ayodhya Ram Mandir Dharm Dhwaj News: २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या कळसावर धर्मध्वजारोहण करण्यात आले. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली होती. यानंतर आता अयोध्येत राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना मंदिरावर लावण्यात आलेला धर्मध्वज भावला असल्याची माहिती मिळाली आहे. हा धर्मध्वज भाविकांच्या पसंतीस उतरत असून, देशभरातून याची मागणी वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
धर्मध्वज म्हणजे स्वतः भगवान रामांची पताका. राम मंदिरावर डौलाने फडकलेला धर्मध्वज अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला आहे. यावर एक वृक्ष, सूर्य आणि ओम आहे. धर्म ध्वजावरील झाडाचे नाव कोविदार वृक्ष आहे. वाल्मिकी रामायणात कोविदार वृक्षाचा उल्लेख आहे. तो कांचनार वृक्षासारखा दिसतो. हा वृक्ष रघुकुल रित दाखवणारा आहे. स्वतः उन्हात उभे राहून सगळ्यांना सावली देणारा हा वृक्ष आहे. कोविदार वृक्षाला जगातील पहिला संकरित वृक्ष मानले गेले आहे. कश्यप ऋषींनी मंदार आणि पारिजात या दोन झाडांच्या संकरातून कोविदार वृक्षाची निर्मिती केली. याच धर्मध्वजाच्या प्रतिकृतीला भाविकांकडून मोठी पसंती मिळत आहे. अयोध्येतून परतताना राम मंदिराची एक आठवण म्हणून भाविक हा धर्मध्वज नेत आहेत.
धर्म ध्वजांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली
एका दुकानदाराने सांगितले की, राम मंदिरात केसरिया धर्म ध्वजांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. बरेच लोक राम मंदिराची आठवण म्हणून खरेदी करतात. राम मंदिराच्या ध्वजाला खूप मागणी आहे आणि आम्ही ते विशेषतः लोकांसाठी ऑर्डर केले आहे. दररोज सुमारे १०० ते २०० ध्वजांची विक्री होते. अयोध्येतून इतर राज्यांमध्ये ध्वज पाठवले जात आहेत. लोक आमच्या दुकानात ते खरेदी करण्यासाठी येतात आणि आम्ही देशभरातील भाविकांसाठी धर्मध्वज कुरिअर करतो. बेंगळुरू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि चेन्नई सारख्या शहरांतून राम मंदिरावर धर्म ध्वजाला मोठी मागणी येत आहे.
दरम्यान, लहान ध्वजाची किंमत ५० रुपये आणि मोठ्या ध्वजाची किंमत १०० रुपये आहे. भाविक, पर्यटक त्यांच्या गरजेनुसार ध्वजाचा आकार निवडतात. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर मंदिराचे पूर्णत्व साजरे करण्यात आले. हा ध्वज फडकल्यावर मंदिरात श्रीरामांचे संपूर्ण वैभव, शक्ति आणि संरक्षण सतत कार्यरत राहते असे शास्त्र सांगते. शिखरावरील ध्वज मंदिरातील सात्विक ऊर्जेला दिशा देतो, नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतो आणि भाविकांना दर्शनाचा पूर्ण फळ प्राप्त होण्यास मदत करतो.
Web Summary : Ayodhya's Ram Mandir flag, featuring a unique tree, sun, and Om, is gaining popularity nationwide. Devotees buy it as a souvenir. Demand surges from cities like Bangalore and Chennai. Small flags cost ₹50, large ones ₹100.
Web Summary : अयोध्या के राम मंदिर का ध्वज, जिसमें एक अनोखा पेड़, सूर्य और ओम है, पूरे देश में लोकप्रिय हो रहा है। भक्त इसे स्मृति चिन्ह के रूप में खरीदते हैं। बैंगलोर और चेन्नई जैसे शहरों से मांग बढ़ रही है। छोटे झंडे की कीमत ₹50, बड़े की ₹100 है।