शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Ayodhya Ram Mandir: श्रीरामलला प्रतिष्ठापना वर्षपूर्ती; करूया रामरक्षा पठण, देव, देश, धर्माला मिळेल संरक्षण कवच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:02 IST

Ayodhya Ram Mandir: श्रीरामलला प्रतिष्ठापना वर्षपूर्तीनिमित्त 'रामरक्षा घरोघरी' हा उपक्रम योजला आहे, त्यात घरी राहूनही सहभागी कसे होता येईल ते पहा. 

आज ११ जानेवारी, पौष शुक्ल द्वादशी, आजच्या तिथीला अयोध्येत अर्थात श्रीरामाच्या जन्मस्थळी उभारलेल्या श्रीराम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठेला एक  वर्ष पूर्ण होत आहे. हे मंदिर म्हणजे रामभक्तांचे श्रद्धास्थान आहे. अशातच श्रीरामाची मूर्ती त्या स्थळी विराजमान झाली हा मोठा सोहळाच! वर्षभरात लाखो भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, अयोध्या नगरी पाहिली आणि आज वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्याचे आयोजले आहे. हा उत्सव आपल्या परीने घरी बसूनही कसा साजरा करता येईल? चला जाणून घेऊ. 

समर्थ व्यासपीठ, पुणे व भक्तिसुधा फाऊंडेशन यांच्याकडून सोशल मीडियावर गेले अनेक दिवस एक मेसेज व्हायरल होत होता. तो म्हणजे 'रामरक्षा घरोघरी। रघुनाथ कृपा करी.' गेल्यावर्षी मकर संक्रांतीला पुण्यात स. प. महाविद्यालयात एक लाख लोकांनी सामूहिक रामरक्षा पठण केले होते. तर यावर्षी घरी राहून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. कसे? तर पुढीलप्रमाणे-

शनिवार ११ जानेवारी - सकाळी ११ ते १२ या वेळेत आपापल्या स्थानी

>> तीन वेळा रामरक्षा पठण>> एक भीमरूपी महारुद्रा मारुती स्तोत्र>> श्री रामनामाची एक जपमाळ

या पठणाचे तीन सामाजिक संकल्प : श्रीरामभक्ती , देशभक्ती, सीमेवरील लष्करी जवानांना रक्षा कवच 

या उपक्रमात प्रचंड संख्येने उत्स्फूर्त सहभागी व्हा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. आपली सामूहिक रामरक्षा पठण संख्या नोंदणी नाव-गावासहित ११ जानेवारी २०२५ रोजी कळवावी. 7020353130 या व्हाट्सअप नंबरवर अथवा https://bhaktisudha.co.in या वेबसाईटवर आपली सेवा झाली हे नोंदवता येईल. तसेच ज्यांना ही स्तोत्र पाठ नाहीत, त्यांच्यासाठी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ११ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत या उपक्रमाचे पठण प्रसारित होईल. ही पठण संख्या अयोध्येत श्री रामचरणी अर्पण  होणार आहे. 

ज्यांना सकाळी ११ ते १२ या वेळेत रामरक्षा पठण करणे जमले नाही, त्यांनी दिवसभरात आपल्या सवडीने हा उपक्रम पूर्ण करावा. कारण रामरक्षा हे केवळ स्त्रोत्र नाही तर संरक्षण कवच आहे. त्याचा लाभ कसा होतो तेही जाणून घेऊ. 

रामरक्षा कधी व किती वेळा म्हणावी?

रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा रामरक्षा म्हटल्याने ती सिद्ध होते. 

रामरक्षाचे इतर फायदे:

१) अशुभ शक्तीपासुन बचाव करते .२) राहु - केतु महादशेचा त्रासातून मुक्ती मिळते.३) कर्जमुक्ती व कर्जवसुली साठी फायदेशीर ठरते. त्यासाठी 'आपदामपहर्तारम....' हा श्लोक १ लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ मिळते.४) रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.उदा: कौसल्याये दृशो पातु:....हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात...ई.

रामरक्षेचे नियम :

>>रामरक्षा आपणांस जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पोर्णिमेपासुन पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते.>> रामरक्षा रोज एकदा ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळीच म्हणावी. वेळ व जागा बदलु नये>>तसेच त्या त्या आजारपणात अनुकूल श्लोकपठण केल्यास आजारपणातुनही मुक्ती मिळते.>>ह्या श्लोकपठणाचे १५००० पाठ जप करणे.>> जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले " श्री रामरक्षा सिद्ध यंत्र " सतत जवळ ठेवावे. म्हणजे त्वरीत आजारपणातुन मुक्तता होते.>>हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. >>कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.

रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे.

कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.

श्रीरामरक्षा’ ह्या स्तोत्राचे महत्व काय?

श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरPuja Vidhiपूजा विधी