शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; गणपती बाप्पासह महादेवांचे मिळवा शुभाशिर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 05:05 IST

Shravan Sankashti Chaturthi August 2022: श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी येणे हा शुभ योग मानला जातो. या संकष्ट चतुर्थीच्या व्रताचरणाची सोपी पद्धत आणि राज्याच्या प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या...

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पूजनाने होते. हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी बाप्पाला प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. ऑगस्ट महिन्यातील श्रावणी संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... (Shravan Sankashti Chaturthi August 2022)

व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवांचा राजा मानला गेलेला श्रावण सुरू आहे. यानंतर पुढील भाद्रपद महिन्यात अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यासाठीची लगबगही सुरू झाली आहे. भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीपूर्वी येणाऱ्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी येत आहे. श्रावणी सोमवार हा महादेवांच्या पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. १५ ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार असून, या दिवशीची शिवामूठ मूग आहे. गणपती बाप्पाच्या संकष्ट चतुर्थीच्या व्रतासह महादेवांना बेलाचे पान वाहून पूजन, नामस्मरण केल्यास गणपती बाप्पासह महादेवांचेही शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. यंदाच्या वर्षीची १५ ऑगस्ट २०२२ रोजी श्रावण संकष्ट चतुर्थी आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. 

असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Shravan Sankashti Chaturthi August 2022 Chandrodaya Timing)

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
अहमदनगररात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे
वर्धारात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ३२ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीShravan Specialश्रावण स्पेशल