शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Astrology Tips: शनिवारी लावलेला मोहरीच्या तेलाचा दिवा, उजळेल तुमचे भाग्य; करा साधे सोपे तोडगे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:25 IST

Vastu Shastra : ज्योतिष शास्त्र तसेच वास्तू शास्त्र आपल्या भाग्योदयासाठी उपाय देते, शनिवारसाठी दिलेल्या तोडग्याचा नक्कीच लाभ घ्या!

धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. देवापाशी दिवा लावल्याने केवळ देव्हाराच नव्हे तर आपले अंतर्मनदेखील उजळून निघते. मन प्रसन्न होते. सकारात्मकता वाढते. मनातील भीती नष्ट होते. यादृष्टीने आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो. काही जण तुपाचा तर काही जण तेलाचा दिवा लावतात. शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी पूजेच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे भाग्य उजळू शकते. त्यासाठी दर शनिवारी दिलेला उपाय करा!

शनी देवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावलेला पसंत असल्याने आपण शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो. त्यात फक्त एका गोष्टीची भर घालायची आहे. ती म्हणजे तेलाच्या दिव्यात एक लवंग देखील टाका. लवंगीचा वापर वास्तुशास्त्राने देखील सुचवला आहे आणि भाग्योदयासाठी ज्योतिष शास्त्रानेदेखील पुष्टी दिली आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार हा छोटासा उपाय केल्यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते. आर्थिक लाभ होतो. आणि या उपायात सातत्य ठेवले तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही. 

या उपायाबरोबर पुढील गोष्टीदेखील लक्षात ठेवा:

>> हिंदू धर्मातील पूजा आणि धार्मिक विधी दरम्यान कापूर वापरला जातो. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर जाळला जातो. मात्र कापूर नियमितपणे जाळताना लक्षात ठेवा की कापूर शुद्ध असावा.

>> त्याचबरोबर धर्मग्रंथांमध्येही दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. म्हणून आपल्या हाताने शक्य तितके दान करा. गरीब आणि गरजूंना मदत करा.

>> ज्योतिष शास्त्रानुसार जीवनात प्रगती होण्यासाठी पशु पक्ष्यांना घासातला घास काढून द्या! असे केल्यास करिअर आणि जीवनात प्रगतीसोबतच यश मिळते.

>> धनधान्याने घरात सुबत्ता राहावी म्हणून रोज तव्यावर केलेली पोळी गायीला, कुत्र्याला, कावळ्याला घाला. आर्थिक अडचणी दूर होतील. 

>> आपल्या उत्पन्नाचा दशांश अर्थात दहावा भाग दान करावा असे धर्मशास्त्र सांगते. कारण आपण समाजाचे केवळ घेणेकरीच नाही, तर देणेकरी देखील असतो. 

>> आपल्या सत्कार्याची आणि दुष्कृत्याची चित्रगुप्त नोंद ठेवत असतो. त्यामुळे प्रत्येक कार्य देवाला स्मरून करत राहा, कसलीही उणीव भासणार नाही!

टॅग्स :Astrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्रPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३