शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

Astrology Tips: २०२५ मध्ये होणार ४ ग्रहांचे स्थलांतर; २०२४ संपण्यापूर्वी करा दिलेले उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:22 IST

Astrology Tips :२०२५ मध्ये होणार ग्रहांचे मोठे बदल; नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी करा, ज्यामुळे नवीन वर्षात यश, कीर्ती, ऐश्वर्य मिळवण्यात बाधा येणार नाही!

२०२५ हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. २०२५ हे वर्ष ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या वर्षी ४ मोठे ग्रह बदल करतील. 2025 च्या सुरुवातीला शनि, राहू-केतू आणि गुरु या चार ग्रहांचे संक्रमण होणार आहे. अशा स्थितीत हे चार ग्रह मिळून सर्व राशींवर प्रभाव टाकतील. म्हणूनच ज्योतिष शास्त्राने २०२४ संपण्यापूर्वी काही उपाय सुचवले आहेत, जेणेकरून २०२५ मध्ये तुम्हाला संपत्ती, ऐश्वर्य मिळून, प्रगतीपथावर नेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. जाणून घ्या उपाय...!

२०२५ मध्ये 'हे' ग्रह स्थलांतरित होणार!

२०२५ च्या सुरुवातीला शनीदेव स्वतःची राशी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश करतील. २९ मार्च २ रो०२५ रोजी ते मीन राशीत प्रवेश करतील. यानंतर मे महिन्यात राहु मीन राशीतून निघून कुंभ राशीत पोहोचेल. १८ मे २०२५ रोजी राहू मीन राशीत आणि केतू सिंह राशीत प्रवेश करेल. यासह गुरू वृषभ राशीतून बाहेर पडून २०२५ मध्ये मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरूचे संक्रमण १४ मे २०२५ रोजी मिथुन राशीतून होईल.

२०२५ मध्ये हे ४ मोठे ग्रह स्थलांतरित होणार आहेत. अशा परिस्थितीत, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी काही उपाय करणे आवश्यक आहे. जेणेकरुन नवीन वर्ष  मंगलमय ठरेल आणि जीवनात सुख, समृद्धी, यश, कीर्ती लाभेल. पुढे दिलेले उपाय सर्व राशींसाठीच फायद्याचे ठरणार आहेत. 

शनिपीडेपासून सुरक्षित राहण्याचे उपाय : 

>> २०२५ मध्ये शनिचे संक्रमण होईल. या काळात पाण्यात साखर आणि काळे तीळ मिसळून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. सूर्योदयापूर्वी हा उपाय करावा.त्यामुळे शनिपीडा होणार नाही आणि  शनि तुमच्यावर प्रसन्न होईल.>> ते शक्य नसेल तर दर शनिवारी शनिदेवाच्या मंत्रांचा जप करा. 'ओम प्रं प्रेमं प्रुम् स: शनैश्चराय नम:' या मंत्राचा जप दर शनिवारी किमान १०८ वेळा करावा. हा उपाय केल्याने तुम्हाला शनीची साडेसाती आणि धैय्यापासून आराम मिळेल.>> याशिवाय शनि मंदिरात जाऊन शनिदेवासमोर मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून दिवा लावा. या उपायाने शनिदेवाच्या प्रकोपापासून काही प्रमाणात आराम मिळेल.

राहू गोचर उपाय :

राहूला ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानले जाते. आपल्याकडून काही अनैतिक गोष्टी घडू नये म्हणून दिलेले उपाय करणे अत्यंत आवश्यक ठरेल. राहु १८ मे रोजी मीन राशीतून कुंभ राशीत जाईल. त्यासाठी आत्ताच दिलेले उपाय करा. >> रोज एक जपमाळ 'ओम रा रहवे नमः' या मंत्राचा जप सुरू करा. याशिवाय पक्ष्यांना दररोज बाजरी खाऊ घाला. तसेच शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.>> तसेच सोमवारी सकाळी काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावेत, त्यामुळे पापबुद्धी नष्ट होऊन सत्कार्याला प्रेरणा मिळेल. 

केतू गोचर उपाय :

केतू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पुण्यसंचय करावा व त्यासाठी दानधर्म करावा. >> केतूचा शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी घोंगडी, उडीद, उबदार कपडे, छत्री, इस्त्री इत्यादी गोष्टी दान करा.>> तसेच केतूला प्रसन्न करण्यासाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला पोळी, भाकरी खाऊ घाला. >> याशिवाय दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. या उपायाने केतूचा दुष्परिणाम होणार नाही!

गुरु गोचर उपाय : 

गुरुबळ वाढावे म्हणून गुरु गोचर सुरु होण्यापूर्वी पुढील उपाय करावेत. >> दर गुरुवारी अंघोळ करताना पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. असे केल्याने गुरुदोष कमी होईल आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.>> गुरु ग्रहाला बळ देण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या गुरूच्या चरणांना स्पर्श करणे आणि त्यांना दररोज नमस्कार करणे.>> तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुवारी उपास सुरु करावा आणि दत्त गुरु तथा भगवान विष्णूंची उपासना सुरु करावी. 

२०२५ मध्ये गुरू देखील मिथुन राशीत पोहोचेल. १४ मे २०२५ रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल. म्हणून गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारपासून 'ओम ग्रं हरी ग्रां स: गुरवे नमः' या मंत्राचा जप सुरू करा. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषNew Year 2025नववर्षाचे स्वागत