शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:07 IST

Astrology: सध्याचा काळ घात-अपघाताचा असल्याचे चित्र ग्रहदशा वर्तवते, जुलै अखेरपर्यंत वेगवेगळ्या घटना घडण्याची शक्यता आहे; त्यासाठी आवश्यक उपाय!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

सध्या अनिष्ट अशी मंगळ केतू युती सिंह ह्या अग्नी तत्वाच्या राशीत जुलै अखेर पर्यंत आहे.  त्याच सोबत गुरु अस्तंगत आहे. काहीच दिवसात शनी वक्री होणार आहे. रागावर, भाव भावनांवर अत्यंत नियंत्रण असावे. ज्यांना BP चा त्रास आहे त्यांनी आपल्या प्रकृतीला जपावे. मंगळ म्हणजे आवेग, आवेश आणि वेग त्यामुळे वाहने जपून चालवावीत, शरीरातील उष्णता वाढेल त्यामुळे तामसी  भोजन आणि कोपिष्ट वागणूक टाळावी. 

Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!

मंगळ हा भूमिपुत्र आहे. त्यामुळे जमिनीचे व्यवहार , रिअल एस्टेट पासून शेअर मार्केट पर्यंत बदल दिसून येतील. वातावरणात सुद्धा अनपेक्षित बदल होतील. सामान्य माणसाला त्रासदायक जीवन असणार आहे. मोठे प्रवास टाळावेत. ज्यांना राग येतो त्यांनी तर पुढील दोन महिने गप्पच राहावे, म्हणजे अनेक प्रसंग टळतील. युद्धाची पार्श्वभूमी सध्या आहेच. मंगळ हा रक्तासंबंधी विकार देतो. पुढील काळात आगी लागणे, घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होण्याची शक्यता, वादळी वारे अशी अस्मानी-सुलतानी संकटं येऊ शकतात. 

सद्यस्थितीत प्रत्येक गोष्टीत आपले मत मांडणे आणि टोकाचे निर्णय रागाच्या भरात घेणे टाळा. मंगळ केतू युती चांगल्या भावात अध्यात्मिकता सुद्धा देईल. सप्तमात ही युती जोडीदारासोबत वाद घडवून दुरावा आणेल, अष्टम भावात मुळव्याध आणि अपघात असे काही योग दर्शवते. त्यामुळे आपण सर्वतोपरी काळजी घेतलेली बरी!

प्रत्येक भावातील मंगळ केतू युतीचे फळ वेगवेगळे असणार आहे आणि आपल्या मूळ पत्रिकेतील ग्रहांप्रमाणे ते बदलणार आहे. या काळात अति स्पष्ट बोलणे टाळावे, संबंध कायमस्वरूपी बदलतील. मंगळ म्हणजे भावंडे, रक्त विकार, शेजारी, पोलीस दल यांच्याशी संबंधित त्रासदायक घटना घडू शकतात. मंगळाच्या हातात शस्त्र आहे त्यामुळे सर्जरीचे प्रसंग येऊ शकतात. ज्यांची अलीकडेच सर्जरी झालेली आहे त्यांनी जपावे . मूळ पत्रिकेत मंगळ केतू युती असेल किंवा मंगळ केतू ह्यांची दशा अंतर्दशा असेल त्यांनी जपावे.  

Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

यावर उपाय काय? तर वर दिलेल्या नियमांचे पालन, श्रद्धा आणि सबुरी ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच उपासना देखील महत्त्वाची आहे. याकाळात सुरु केलेली उपासना कायम स्वरूपी सुरु ठेवावी, लाभच होईल. त्यासाठी हनुमान चालीसा नित्य पठण, सद्गुरू स्मरण, अखंड नाम:स्मरण, आपल्या आराध्य दैवताचा जप, पोथीवाचन आणि ध्यानधारणा केल्याने निश्चितच लाभ होईल. 

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिष