शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषशास्त्र सांगते, लग्न ठरवताना 'या' राशींच्या जोड्यांनी एकत्र येणे म्हणजे घराची युद्धभूमी करणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 08:00 IST

आयुष्याची सप्तपदी ही तप्तपदी ठरू नये असे वाटत असेल तर संपूर्ण लेख वाचा!

संसार म्हटला की भांडण होतच राहणार. परंतु, सतत भांडत राहणे म्हणजे संसार नाही ना? 'कधी तिने मनोरम रुसणे, रुसण्यात उगीच ते हसणे' इथवर लटका राग असेल, तर 'ऋणानुबंधांच्या गाठी' जन्मभर टिकतील. परंतु, दोघांनी भांडणात तलवारी उपसल्या, तर नात्याचा खून झालाच म्हणून समजा. यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला विवाहपूर्व सूचना देते. त्यानुसार आपल्या राशीला अनुकूल राशीचा जोडीदार निवडून सप्तपदी घेतली, तर भविष्यातील वादावाद टाळता येतील. चला तर जाणून घेऊया, आपल्या राशीला कोणत्या राशीचा जोडीदार चालणार नाही ते!

कर्क आणि सिंह रास :ज्योतिषशास्त्रानुसार कर्क आणि सिंह राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास गृहकलहाला खतपाणी मिळेल. या राशींच्या व्यक्ती लग्नामुळे एकत्र आल्या, तरी त्यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे त्यांचे नाते परस्परांशी बांधले जाणार नाही. कर्क राशीचे लोक नात्याबद्दल सजग असले, तरी सिंह राशीचा वरचढ स्वभाव नात्यात अहंभाव निर्माण करतो. त्यामुळे प्रेमाला थारा मिळत नाही.

कुंभ आणि मकर रास : कुंभ आणि मकर राशीचे लग्न जुळल्यास वरवर पाहता जोडी उत्तम असेल, दिसेल. परंतु दोघांचे आपापल्या क्षेत्रातील, स्वभावातील, कामातील मतभेद यांचा परिणाम नात्यातील मतभेद वाढवण्यास हातभार लावतो आणि दरदिवशी भांडणाला कारण मिळते. मकर राशीचे लोक अतिसंवेदशील, तर कुंभ राशीचे लोक अति तटस्थ असतात. दोन्ही राशींनी स्वभावाची दोन टोवंâ गाठल्यामुळे नातेही दुभंगू लागते.

मिथुन आणि कन्या रास :मिथुन राशीचे लोक भावुक असतात, तर कन्या राशीचे तटस्थ आणि संशयी वृत्तीचे असतात. मिथुन राशीच्या लोकांना प्रेमाच्या मोबदल्यात कन्या राशीकडून रुक्ष अनुभव मिळाल्याने ते सतत नाराज राहतात. याउलट कन्या राशीचे लोक मिथुन राशीचा जोडीदार असल्यास त्याचा विचार न करता त्याला सोडून आपल्या आयुष्यात पुढे निघून जातात.

वृषभ आणि तुळ रास :वास्तविक पाहता वृषभ आणि तुळ राशीचे लोक नाते, प्रेम, कौटुंबिक संबंध याबाबत नेहमी जागरुक असतात. याच कारणामुळे त्यांचे परस्पराबद्दल प्रेम आणि ओढ त्यांचे नाते मजबूत ठेवते. परंतु, काही काळानंतर दोन्ही राशींमध्ये या गुणाचा अभाव निर्माण होऊन दोन्ही राशी दुरावतात आणि नात्यांमध्ये दरी निर्माण होत, विलग होतात.

मीन आणि वृश्चिक रास : ज्योतिषशास्त्रानुसार मीन आणि वृश्चिकची जोडी आदर्श मानली जाते. परंतु, राशीचे गुण आडवे येतात आणि नात्यात कटुता निर्माण करतात. मीन राशीचे लोक अति संवेदनशील आणि प्रेमळ असतात, याउलट वृश्चिक राशीचे लोक प्रेमळ असूनही प्रेम व्यक्त करण्यात हलगर्जीपणा करतात. तसेच त्यांच्या संशयी स्वभावामुळे मीन राशीचे लोक दुखावले जातात आणि याच कारणामुळे या दोन राशींमध्ये प्रेमाच्या जागी विसंवादाची  किंवा अबोल्याची पोकळी निर्माण होते व त्याचे पर्यवसान नाते तुटते.

कर्क आणि धनु रास :कर्क आणि धनु राशीचे एकत्र येणे तसे दुर्मिळच! कारण, या राशींचे गुण परस्परविरुद्ध आहेत. धनु राशीचे लोक काटेकोर आणि वेळेला महत्त्व देणारे असतात, तर कर्क राशीच्या लोकांना वेळेचा, परिस्थितीचा काही परिणाम होत नाही. ते आपल्याच तंद्रित असतात. या कारणामुळे धनु राशीला कर्क राशीशी जुळवून घेणे अशक्य ठरते. परिणामी, या दोन्ही राशी एकत्र येत नाहीत.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष