शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

Astrology: मंगळाची पत्रिका असेल तर मंगळी जोडीदारच शोधायचा का? शास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:26 IST

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ६

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

मंगळाची पत्रिका... अबबब...अशीच विनाकारण धास्ती समाजात आहे. मंगळ चांगला की वाईट ह्याबद्दल बरेच समज-गैरसमज आहेत. मंगळ हा व्यक्तीतील अहंकार , धाडस , शक्ती आहे आणि ती शक्ती चांगल्या आणि वाईट दोन्ही कामासाठी वापरली जाते. वैवाहिक जीवन हे कोमल, शीतल आहे, तिथे हिंसा क्रौर्य नाही . वैवाहिक जीवनात भावनिक गुंतवणूक असते, तिथे नात्यांचा समतोल राखणे गरजेचे असते.  म्हणूनच सप्तम स्थानात तूळ रास येते .तूळ रास ही शुक्राची रास असून ती जल तत्वाची रास आहे. शुक्र हा वैवाहिक सुखाचा,आनंदाचा आणि जल तत्वाचा, सौभाग्याचा कारक आहे. अशा ह्या जलतत्वाच्या ग्रहासोबत जर मंगळासारखा आगीचा धगधगता गोळा आला तर विपरीत परिणाम मिळू शकतात .कुंडलीतील १२, १, ४, ७, ८ ह्या स्थानात मंगळ असेल तर मंगळ दोष धरला जातो. १२, १ आणि ४ ह्या स्थानातील मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर येते, तसेच सप्तम स्थानातील मंगळ स्वतः सप्तम स्थानातच असतो. 

Astrology: पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तरी विवाह शक्य असतो का? सविस्तर जाणून घ्या!

अष्टम स्थानातील मंगळाचा दोष धरला आहे, कारण अष्टम स्थान हे सौभाग्याचे स्थान आहे तसेच तिथे खऱ्या अर्थाने दोन्ही शरीराचे मिलन होते, त्यातही जलतत्व लागतेच. अशा ठिकाणी मंगळ असेल तर अचानक संकटे ,सौभाग्याची हानी तसेच अचानक घातपाताची शक्यता असते. म्हणून येथील मंगळाचा दोष धरला आहे. काही जण धनस्थानातील मंगळाला सुद्धा दोष देतात, कारण ते कुटुंब स्थान आहे .तसेच त्याची दृष्टी अष्टमावर पडते .अनेकांच्या पत्रिकेत हा योग सापडतो त्यामुळे फक्त त्याला दोष देणे चुकीचे ठरेल. मंगळ ही चेतना आहे, उर्जा आहे , तामसी , स्वतंत्र वृत्तीचा , वासना असणारा ,अविचारी असून अचानक तडकाफडकी फळे देणारा आहे. 

मंगळ स्वतःच्या राशीत ,उच्च राशीत असेल तसेच तो पापग्रहांच्या युती दृष्टीत नसेल किंवा क्रूर नक्षत्रात नसेल तर तो शुभ समजावा. शुभ मंगळात जिद्द , धैर्य , पराक्रम ,जोम , रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. वासना शुभ असते. २, ७ ह्या राशीत मंगळाची धग अधिक असते. सप्तम स्थानातील धनु राशीचा मंगळ सुद्धा संरक्षक म्हणून काम करतो. मंगळ क्रूर नक्षत्रात किंवा वक्री असेल वाईट फळे देतो.. अशुभ मंगळ हा असंतुलित असतो.हव्यास ,असमाधानी वृत्ती ,प्रबळ वासना ,सहानुभूती नसणारा, हुकुमशाह असतो.

Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!

प्रथम स्थान –आत्मविश्वास ,आरोग्य, उत्तम जिद्द, संहारक नसून संरक्षक असतात .चतुर्थ स्थान – वस्तू , घर चांगले असते.सप्तमस्थान –बिघडला नसेल तर वासना शुद्ध ,जोडीदारासाठी संरक्षक ,शरीरसुख चांगले.अष्टमस्थान – उत्तम आयुष्य आणि शरीरसुख .सासरी प्रगती दाखवणारा .द्वादश स्थानी – वैद्य आणि संरक्षक क्षेत्रासाठी चांगला .परदेशात धंदा व्यवसाय.सप्तम स्थान - पाशवी वृत्ती आणि वासना ,लैंगिक विकार ,लग्न स्थानावर  दृष्टीचतुर्थ स्थान – नातेवाईकांशी वाद , पटवून घेण्याची वृत्ती नसते , हेखेखोर .वर्चस्व गाजवणारा , सप्तम स्थानावर दृष्टी प्रथम स्थान – हट्टीपणा , अहंकार , हव्यास , उतावीळ पणा ,अपघाती , वासना अधिक , ४, ७ स्थानांवर दृष्टी .अरेरावी करणारा उद्धट .व्यय स्थान – पैशाची उधळपट्टी , चैनी, चोरून संबंध ,सप्तम स्थानावर दृष्टी.अष्टम स्थान – सौभाग्याची हानी , लैंगिक विकार आणि वृत्ती , अपघात .

एकाच्या कुंडलीत ज्या स्थानात मंगळ असेल त्याच स्थानात जोडीदाराच्या कुंडलीत शनी असेल तर नक्कीच त्रासदायक होईल. गुरूची दृष्टी किंवा युती मंगळाबरोबर असेल तर चांगली . मंगळाची शक्ती चांगल्या कामासाठी वापरता येते.  बरेच वेळा शुक्र , चंद्रासोबत युती असेल तर मंगळाची शक्ती कमी होते. हे सौम्य ग्रह मंगळाची धग कमी करतात . दोघांच्याही एकाच स्थानी पापग्रह असणे चांगले नाही . मंगळाला मंगळाचीच पत्रिका लागते असे नाही . मंगळाची वासना शक्ती शमवणारी पत्रिका असावी. कर्क लग्नी मंगळ असेल आणि दुसऱ्याच्या पत्रिकेत सप्तम स्थानात वृषभेचा मंगळ असेल. हा मंगळ वासना कमी करणारा तितका जोम नसणारा असतो ,त्याच्यासोबत सप्तमात वृषभेचा मंगळ असणारी पत्रिका असेल तर शुक्राच्या राशीतील मंगळाला वासना अधिक असतात. 

Astrology: विवाह यशस्वी होण्यासाठी कुंडलीमिलन करताना कालानुरूप बदल झाले पाहिजेत; अन्यथा... 

'अशा' पत्रिकांचे मिलन करू नये -

मुलीच्या पत्रिकेत अष्टम स्थानात मंगळ आणि सप्तमेश रवी असेल  आणि मुलाच्या पत्रिकेत अष्टमात मंगळ हर्शल युती असेल तर. मंगळ रवी सारखे अपघाती ग्रह अष्टम स्थानात सौभाग्याची हानी करतील .मुलाच्या पत्रिकेत अष्टमात असलेली मंगळाची हर्षला सोबत असलेली युती अपघात दर्शवते. अशा पत्रिका फक्त मंगळाला मंगळ म्हणून घेऊ नये. काही लग्नांना मंगळ अशुभ फळे देतो. बुधाची ,शुक्राची आणि शनीच्या लग्नांना मंगळ चांगली फळे देत नाही . अशा लग्नांना पत्रिकेत मंगळ १२, १, ४, ७, ८ ह्या भावात असेल आणि बिघडलेला असेल तर अशुभ होईल. आधुनिक काळात मंगळ हा स्त्रीयांना वरदान आहे असे म्हंटले जाते .मंगळ असणाऱ्या मुली शूर ,धाडसी , कर्तुत्ववान ,अर्थार्जन करणाऱ्या, उत्तम निर्णय क्षमता असणाऱ्या असतात .

मंगळाची पत्रिका म्हंटली कि अगदी लगेच तोंड फिरवून विवाह मोडणे हे आजही आपल्या समाजात सर्रास होताना दिसते . ९०% लोकांच्या पत्रिकेत मंगळ आहे मग त्यांनी विवाह करायचे नाहीत का? पुढील भागात ह्याबद्दल अधिक माहिती घेवूया .

संपर्क : 8104639230

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्न