शहरं
Join us  
Trending Stories
1
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
4
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
5
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
6
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
7
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
8
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
9
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
10
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
11
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
12
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
13
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
14
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
15
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
16
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
17
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
18
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
19
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
20
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!

Astrology: विवाह यशस्वी होण्यासाठी कुंडलीमिलन करताना कालानुरूप बदल झाले पाहिजेत; अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:25 IST

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ५

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

पूर्वीच्या काळी समाज प्रगत नव्हता, शहरीकरण झालेले नव्हते, समाज शिक्षित नव्हता आणि त्यामुळे वैचारिक प्रगती आजच्यासारखी नव्हती . विवाह हे पंचक्रोशीत किंवा नात्यातच होत असत. मुलामुलींच्या अगदी उमलत्या, कोवळ्या वयात संसाराला सुरवात होत असे. घरात पाच पंचवीस माणसे असत, सगळ्यांचा धाक, पण वय लहान म्हणून शिस्त असली तरी भरपूर लाड होत असत . माहेर सासर एकच वाटत असे. आईपेक्षाही त्या काळातील मुली सासू सोबत अधिक वर्ष घालवत असत. 

Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!

पूर्वीच्या काळी साधे जीवन मग त्यात विवाह हा आजकालचा संगीत , मेहेंदी वगैरे सारखा सोहळा नसे. सर्व चालीरीतींना अनुसरून घरची मोठी मंडळी विवाह ठरवत आणि संपन्नही होत असत.

विवाहाशी संबंधित जुन्या पद्धती आणि निष्कर्ष : तेव्हा विवाह ठरवायच्या पद्धती सोप्या साध्या आणि मजेशीर होत्या . स्त्रिया हळद कुंकवाच्या पुड्या टाकत, जी पुडी उचलेल तिथे विवाह. पहिल्या ज्या स्थळाकडून होकार येईल तिथे मुलगी द्यायची असे ठरायचे. अनेकदा देवाला कौल लावून विवाह ठरत असत. मुलीसमोर शेतजमिनीची, गोठ्यातील, अग्निहोत्रातील, स्मशानातील, नापीक जमिनीतील, चव्हाट्याच्या जागेवरील, नदीच्या पात्रातील, जुगारी अड्ड्यावरील असे मातीचे गोळे आणून ठेवत आणि मुलीला त्यापैकी एक गोळा उचलायला सांगत. 

मुलीने शेतजमिनीचा गोळा उचलला तर ती आल्यावर घरात अन्नाची बरकत येईल. गोठ्यातील गोळा उचलला तर गाई म्हशींची बरकत होईल. अग्निहोत्राचा गोळा उचलला तर घरातील धार्मिकता वाढेल, कुलाचार ,धर्म वाढेल. नदीच्या पात्रातील गोळा उचलला तर घरात पैशाचा ओघ राहील. पाणी म्हणजे जीवन, लक्ष्मी. जुगारी अड्ड्यावरील उचलला तर घरात भाऊबंदकी होईल.  चव्हाट्या वरचा उचलला तर घरातील भांडणे चव्हाट्यावर जातील. नापीक जमिनीतला गोळा उचलला तर ती आल्यापासून लाभ होणार नाहीत . स्मशानातील उचलला तर वैधव्य लवकर येईल अशा समजुती असत आणि त्याप्रमाणे निर्णय होत असे. 

Astrology: पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तरी विवाह शक्य असतो का? सविस्तर जाणून घ्या!

आजच्या आधुनिक काळात ह्या सर्व पद्धतीना आपोआपच  तिलांजली मिळाली . आजचे जग प्रगत आहे . आजची मुले आणि मुलीही अगदी परदेशात सुद्धा एकटे राहतात , मोठमोठ्या पदांवर काम करून घाम फुटेल इतके मोठमोठे पगार सुद्धा कमावतात. त्यामुळे आता पूर्वीच्या विवाह पद्धती अर्थातच मोडीत निघाल्या आहेत पण विवाह संकल्पनेला निदान आज तरी पूर्णपणे सुरुंग लागलेला नाही.

आता मुलं-मुली बाहेरच भेटतात ,त्यांना आपण अनुरूप आहोत असे वाटले तर दोन कुटुंबे एकत्र भेटतात. लग्नातील देणीघेणी त्याच्या मोठमोठाल्या याद्या ह्या सुद्धा आता बाद झाल्या आहेत . आजच्या काळात दोघांचे एकमेकांशी जमणे आणि त्यांनी एका छताखाली आनंदाने राहणे हेच सर्वात महत्त्वाचे ठरत आहे. पाश्च्यात्य संस्कृतीचे अनुकरण आपण नेहमीच करत आलो आहोत .आपली विवाह संस्थाही त्याला अपवाद नाही . भारतात सध्या 'लिव इन रिलेशन' चे पेव फुटले आहे. मात्र त्याला अद्याप पूर्णतः मान्यता नाही. भारतीय मन असे नाते स्वीकारत नाही. याउलट मुलगा आणि मुलगी ह्यांनी विवाह करून एकत्र एका छताखाली आनंदात एकोप्याने राहणे हीच काळाची खरी गरज आहे. एखादी मुलगी छान नांदते तेव्हा आईवडील जावयाचे सुद्धा तितकेच कोडकौतुक करताना दिसतात. पण ते तसे एकत्र नांदावेत यासाठी कुंडली मिलन करताना मुख्य गुण दोष बघावे लागतात. 

म्हणून योनिमैत्रीचा विचार अधिक स्पष्टपणे केला जातो. षडाष्टक योग टाळावा कारण त्याने शत्रुत्व येते म्हणून लग्न आणि चंद्र षडाष्टक टाळावे . सप्तमात २ शत्रू ग्रह आले तर वैवाहिक जीवनाची सुरवातच कटकटीतून होताना दिसते .तसेच अष्टमस्थानात सुद्धा शत्रूग्रह नकोत कारण ते लैंगिक सुखाचे स्थान आहे . 

एक नक्षत्र आणि एकच चरण असेल तर विवाह करू नये एक नाडी दोष निर्माण होतो, त्यांना संतती होण्यास अडथळे येतात. पण ज्यांना संतती नकोच असेल अशांसाठी हे पहायची गरज नाही. त्यांनी विवाह करायला हरकत नाही . समाजात परंपरागत ज्या गोष्टी चालू आहेत त्या एकदम अचानक खोडून टाकणे जमत नाही त्यामुळे आपल्याला गुणमिलन सुद्धा करून द्यायला पाहिजे.  किती गुण जुळतात तेही सांगायला लागते. 

पूर्वीच्या काळी सगोत्र विवाह करावे का असा प्रश्न येई. पूर्वी पलीकडच्या वाडीत ,पेठेत , नात्यात ,आत्याकडे मावशीकडे मुलगी दिली जात असे. अशावेळी  शारीरिक दोष निर्माण होत असत. त्यामुळे वैदिक शास्त्रात सगोत्र विवाह नको असे सुचवले जात असे. मात्र सद्यस्थिती वेगळी असल्याने पती पत्नी एकत्रपणे आनंदात राहणे ही काळाची गरज झाली आहे, त्यानुसार ज्योतिष शास्त्राची समीकरणेही बदलली आहेत. 

Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!

विवाह कालही होत होते, आजही होत आहेत आणि भविष्यात सुद्धा होत राहतील. प्रश्न आहे तो कसे होतील आणि विवाहाची मूळ संकल्पना आपल्याच मातीत मूळ धरून टिकेल का?

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्न