अनेकदा आपण कठोर परिश्रम करतो, पण नशिबाची साथ नसल्यामुळे हवं तसं यश मिळत नाही. अशा वेळी ज्योतिषशास्त्रातील काही छोटे घरगुती तोडगे (Remedies) सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतात. स्वयंपाकघरात सुंगध देणारी 'वेलची' तुमच्या करिअरचे बंद दरवाजे उघडू शकते.
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
जाणून घ्या करिअरच्या वाढीसाठी वेलचीचे ३ प्रभावी उपाय:
१. कामावर जाण्यापूर्वी हा उपाय करा (Success in Work)
जर तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी किंवा इंटरव्यूसाठी बाहेर जायचे असेल, तर सकाळी घरातून निघताना दोन हिरव्या वेलची मुखशुद्धी म्हणून खा. असे केल्याने तुमची वाणी प्रभावी होते आणि बुध ग्रहाच्या प्रभावाने समोरच्या व्यक्तीवर तुमची चांगली छाप पडते.
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
२. उशाखाली वेलची ठेवून झोपा (To Remove Obstacles)
जर तुम्हाला नोकरीत सतत समस्या येत असतील, तर रात्री झोपताना एका पांढऱ्या कपड्यात तीन वेलच्या बांधा आणि ती पुडी तुमच्या उशाखाली ठेवा. सकाळी उठल्यावर ती वेलची दान करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. हा उपाय सलग काही दिवस केल्याने कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते.
३. अंघोळीच्या पाण्यात वेलची (To Boost Confidence)
तुमचा आत्मविश्वास कमी असेल किंवा निर्णय घेताना गोंधळ होत असेल, तर वेलची उकळून ते पाणी तुमच्या अंघोळीच्या पाण्यात मिसळा. ज्योतिषशास्त्रानुसार, यामुळे अंगातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मन प्रसन्न राहते, ज्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कामावर होतो.
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
टीप : सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून, अधिक महितीसाठी त्या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेणे उचित ठरेल.
Web Summary : Cardamom offers simple remedies for career success. Use before work, under your pillow, or in bathwater to boost confidence and remove obstacles, enhancing positive energy.
Web Summary : सफलता के लिए इलायची के सरल उपाय। काम से पहले, तकिये के नीचे या नहाने के पानी में उपयोग करें, आत्मविश्वास बढ़ाएं, बाधाएं दूर करें और सकारात्मक ऊर्जा बढ़ाएं।