>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
विवाह दोघांचा असला, तरी त्यात दोन्ही कुटुंबाचाही मोठा किंबहुना अति महत्वाचा सहभाग असतो. सगळ्यांसाठी हा आयुष्यातील आनंदाचा प्रसंग असतो. त्या दोघांच्याही सहजीवनाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही कुटुंब एकत्र आलेली असतात. विवाहाच्या पश्च्यात संसाराला सुरवात होते तेव्हा संसारिक जबाबदाऱ्या दोघांनाही निभवाव्या लागतात . आपण ज्या कुटुंबात विवाह करून आलेले आहोत त्या कुटुंबाच्या चालीरीती रूढी परंपरा , घरातील व्यक्तींचे स्वभाव आवडी निवडी हे सर्व समजायला आणि त्यात लोणच्या सारखे मुरायला काही काळ जावा लागतोच.
विवाहाचा संबंध पत्रिकेतील फक्त सप्तम भावाशी नसून पत्रिकेतील प्रत्येक भावाशी निगडीत आहे . कसा ते आपण आज पाहूया . लग्न भाव आपली बुद्धी देहबोली , विचार , जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देत असल्यामुळे दोघांचेही लग्न जुळते की नाही, ते षडाष्टकात नाही ना, ते पहिले पाहिजे. नाहीतर विचारात भिन्नता आली तर कसा होईल संसार सुखाचा?
धन भाव हा कुटुंब आणि कौटुंबिक सौख्याचा आहे. त्यामुळे त्या दोघांचे, विशेष करून मुलीचा दुसरा भाव निर्दोष असावा . त्याच सोबत चतुर्थ भाव, कारण चतुर्थात आपले मन आहे . आपल्या मनाची सरलता ह्या भावावरून समजते. चतुर्थ भावावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर व्यक्तीची मती सकारात्मक असणार . चतुर्थेश दुषित असेल तर त्रासदायक घरात कलह होतील होतील. पंचम भाव प्रेम संबंधाबद्दल सूचित करेल . एकमेकातील प्रेम आणि संतती पंचम भाव दर्शवेल. षष्ठ भाव जबाबदारीचा आहे. मुलीचा हा भाव शुद्ध नसेल तर जराश्या कारणावरून ती माहेरी पलायन करेल . सप्तमातील ग्रह संसार सुखापेक्षा त्या दोघांमधील भावनिक संबंध दर्शवेल . सप्तमेश ६, ८, १२ मध्ये असेल तर व्यक्ती संसार सुख घेवूनच आलेली नाही किंवा त्यात कमतरता असणारच .
अशा प्रकारे सर्व भावांचा संबंध विवाहाशी आहे. जशी पत्रिका आपण आपल्या मुलाची पाहणार अगदी तशीच मुलीची सुद्धा पहावी लागणार . दोघांच्याही दशा अनुकूल असाव्या लागतात . महादशा स्वामी निर्णायक घटक आहे त्यामुळे त्याचा संबंध त्रिक भावांशी नसावा . सप्तम भावात दोघातील गोडवा जपणारे ग्रह हवेत . आपण श्रीखंड पुरी खायला बसलो आणि समोर बंदूक सुरा घेवून गुंड बसला तर लागेल का ते जेवण गोड आपल्याला अगदी तसेच आहे ते रंगाचा बेरंग करणारे पाप ग्रह नकोत सप्तमात .
कालच एक पत्रिका पहिली . लग्नात वक्री हर्शल नेप आणि भाग्यात कन्या राशीचा शुक्र कन्या नवमांशात. शुक्र पंचमेश . कसा गोडवा टिकणार . चतुर्थ भावात मंगळ असेल तर सासूशी पटणे कठीण कारण व्यक्ती आक्रमक म्हणजे कुरघोडी करणारी असणार . अशा मुलीनी एकत्र कुटुंबात विवाह करू नये. मेष लग्नाला शुक्र दशा , शुक्र चतुर्थात आणि अंशात्मक युतीत बुधाच्या बुध सुद्धा चतुर्थात तिथे मंगल सुद्धा . विवाह दिला नाही शुक्र दशेने . षष्ठात एकही ग्रह नाही. शुक्रासोबत बुधानेही फळ दिले. शुक्र गंडातात . विवाह दशा स्वामीने दिला नाही .
नुसते गुण गुण करू नका , इतरही आवश्यक गोष्टी बघा , विवाह एकदाच होतो आयुष्यभर सर्वार्थाने साथ देईल असा जोडीदार शोधताना डोळस पणे शोधा . घाई नको . जितक्या घाईने विवाह तितक्याच घाईने मग घटस्फोट होतात हे चित्र आहे .
पत्रिका मिलनापासून ते मुहूर्ता पर्यंत सर्व शास्त्राचा आधार घेऊन करा. तुमचे आधुनिक विचार बाजूला ठेवा ,ग्रहांच्या समोर ते टिकाव धरणार नाहीत . कुठलीही पत्रिका परिपूर्ण नाही पण आपण त्यातल्या त्यात अधिकाधिक गोष्टी जुळतात का ते बघायचे . लग्नेश हर्शल नेप. सोबत असेल तर फसवणूक होवू शकते .
दोघांना एकमेकांच्या बऱ्या वाईट बाजू समजल्या पाहिजेत , आपल्याला तिच्यासोबत काय तडजोड करावी लागणार ते आधीच समजले तर मनाची तयारी होईल. विवाह व्हावा म्हणून आधी सगळ्याला हो हो म्हणायचे आणि मग बायकोची ट्रान्स्फर झाली तर तिला नोकरी सोडायला भाग पाडायचे हे चालणार नाही. प्रत्येकाने एक एक पाऊल पुढे टाकायचे आहे तरच संसाराचा गाडा सुखाने पुढे जायील आणि ह्यासाठी ग्रहस्थिती पाहणे उचित आहेच .
नुसते गुणमिलन आणि ग्रहमिलन नाही तर दोघांचेही पुढील आयुष्य पाहताना संतती , वैचारिक बैठक , आर्थिक नियोजन , आयुष्य मर्यादा , संतती , स्थावर , कुटुंबातील वावर , एकोपा जपणे अश्या सर्व गोष्टी पहिल्या तर त्या दोघांचा संसार सुखाचा का नाही होणार ? आणि अश्या योग्य जोड्या जुळतात तेव्हा त्याच ताकदीचे ग्रहयोग येतात ज्याला आपण “ योग “ म्हणतो.प्रत्येकाच्या आयुष्यात हे योग ठरलेले असतात आणि ते योग्य वेळीच येतात , कार्य संपन्न होते .
संपर्क : 8104639230