शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:54 IST

Astro Tips: मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते, पण त्याचा दैनंदिन वापर कसा करता येईल ते जाणून घ्या. 

सध्या लोकांच्या विचारांमध्ये तर नकारात्मकता आहेच, शिवाय आपल्या अवती भोवती सुद्धा नकारात्मक ऊर्जेचे वलय वाढले आहे. त्यात आपल्या दैनंदिन घडामोडी, रोज कानावर पडणाऱ्या बातम्या, आपल्या आशा अपेक्षा यामुळे येणारी नाराजी, या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. हे नकारात्मक वलय सभोवती असेल तर आपली प्रगती होणार नाही. यासाठी मिठाच्या पुडीचा उपयोग करा असे ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी सांगतात. 

नकारात्मक वलय कसे ओळखावे?

दिवसभर सुस्ती येणे, जडपणा वाटणे, निरुत्साह असणे, काही न सुचणे, चिंतातूर असणे, कोणतेही काम करतांना एकाग्रता नसणे, काही कारण नसतांना चिडचिड होणे, राग येणे किंवा शरीर व्याधीग्रस्त होणे. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असेल, तर ‘आपल्यावर आवरण आले आहे’, असे आपण म्हणू शकतो. आवरण वाढले की, आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दुर्बल होतो. असे होऊ नये; म्हणून आपण गांभीर्याने आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक असते.

Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!

मिठाच्या वापराचे महत्त्व : 

वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही शक्ती कार्यरत असतात. अनिष्ट अर्थात दुसऱ्याचे चांगले होऊ नये ही इच्छा बाळगणारे अनेक हितशत्रू आपल्या सभोवती असतात. नकारात्मक शक्ती प्रभावी असल्याने तिचा परिणाम होऊन आपली प्रगती थांबते, कामात अडथळे येतात, अपयश येते आणि पर्यायी नैराश्य येते. तसे होऊ नये म्हणून ज्योतिष तथा वास्तू शास्त्रात काही सोपे परंतु प्रभावी उपाय दिले आहेत, जे आपण दैनंदिन जीवननातही करू शकतो. त्यातलाच एक म्हणजे मिठाच्या पुडीचा वापर!

मिठाचा वापर : 

ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी सांगतात, मीठ सहजरित्या उपलब्ध असते आणि त्यात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते. मिठाची छोटीशी पुडी आपल्याबरोबर ठेवणे आपल्याला सहज शक्य असते. तिचा वापर कधी, कुठे आणि कसा करायचा ते जाणून घेऊ. 

Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!

छोट्याशा पुडीत चमचाभर खडे मीठ किंवा बारीक मीठ घ्यावे आणि ते कायम आपल्या पाकिटात अथवा पर्समध्ये ठेवावे. एखाद्या ठिकाणी गेल्यावर किंवा एखाद्या व्यक्तीच्या सहवासात असताना जर तुम्हाला नकारात्मकता आपल्याला वेढतेय असे वाटत असेल तर दोन क्षण उठा, वॉश रूममध्ये जा, मिठाच्या पुडीतले चिमूटभर मीठ दोन्ही हातांवर चोळा आणि हात स्वच्छ धुवा. या उपायाने तुमच्याभोवती असलेले नकारात्मक वलय तुटते आणि तुम्ही सकारात्मक ऊर्जा अनुभवू लागता. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष