नैसर्गिक प्रसूती होण्याच्या केसेस सध्या कमी आढळतात. सिझेरियन हा पर्याय निवडावा लागतो. कोणत्या दिवशी डिलेव्हरी करायची असा पर्याय मिळाल्यावर पालक आपल्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्योतिषांकडे धाव घेतात. उत्तम दिवस, उत्तम मुहूर्त, उत्तम क्षण निवडून त्याच वेळेला प्रसूती करा असा आग्रह धरतात. मात्र प्रत्यक्षात तसे होते का? तर नाही! अचुक वेळ कोणीच गाठू शकत नाही, कारण ती वेळ नियतीने ठरवलेली असते. मूल जन्माला आले की त्या वेळेनुसार कुंडली मांडली जाते, भविष्य सांगितले जाते, मात्र भविष्य घडवणे हे सर्वस्वी बाळाच्या हाती असते. ही गत कलियुगातल्या पालकांचीच नाही, तर त्रेतायुगापासून सुरु आहे.
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
कथा आहे रावणाची! त्याची पत्नी मंदोदरी नवमास पूर्ण होऊन प्रसूत होणार, त्या काळात रावणाने आपल्या बाळाची पत्रिका चांगली घडावी यासाठी नवग्रहांना कैद केले. आपले मूल शूर, वीर, पराक्रमी, अमर व्हावे असे त्याला वाटले. त्यावेळेस नवग्रहांपैकी शनी ग्रहाने स्थलांतर केले. त्यामुळे रावणाला पुत्र झाला तेव्हा सगळे ग्रह एका जागी आणि एक ग्रह बाहेर असल्याने तो शूर, वीर, झाला पण अमर होऊ शकला नाही.
रागारागाने रावणाने शनी देवाला पुन्हा पकडून कैद केले. अनेक वर्ष हे ग्रह बंदिवासात होते. सीता माईला शोधताना जेव्हा हनुमंत तिथे आले, तेव्हा त्यांनी शनिमहाराजांना वंदन करून त्यांची सुटका केली. शनी आणि हनुमानाचे सख्य जमले. शनी देवाने सांगितले, जो कोणी हनुमानाची भक्ती करेल त्याला मी त्रास देणार नाही. जो सत्याच्या, न्यायाच्या, नैतिकतेच्या बाजूने लढेल त्याला अभय देईन, यश देईन! त्यामुळे हनुमान आणि शनी यांचे नाते दृढ झाले.
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्यांना भाकीत वर्तवता येते, पण जन्म मृत्यूची वेळ देवाकडे अबाधित असल्याने त्यात फेरबदल करणे आजतागायत कोणालाही जमले नाही, रावणालाही नाही; मग आजच्या पालकांची काय कथा!
त्यामुळे जी जन्माची वेळ असते तोच बाळाचा शुभ मुहूर्त समजावा आणि त्याला त्याचे भविष्य घडवण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित करावे.