शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:13 IST

Chaturmas Ashadh Sankashti Chaturthi July 2025: चातुर्मासातील पहिल्या संकष्ट चतुर्थीची चंद्रोदय वेळ काय? व्रत पूजन कसे करावे? जाणून घ्या...

Chaturmas Ashadh Sankashti Chaturthi July 2025: चातुर्मास सुरू झाला आहे. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. आषाढ संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त काय? चंद्रोदय कधी असेल? व्रत पूजनाची सोपी पद्धत कोणती? जाणून घेऊया...

गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. 

आषाढ संकष्ट चतुर्थी: सोमवार, १४ जुलै २०२५

आषाढ वद्य चतुर्थी प्रारंभ: रविवार, १३ जुलै २०२५ रोजी रात्रौ ०१ वाजून ०२ मिनिटे.

आषाढ वद्य चतुर्थी समाप्त: सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी रात्रौ ११ वाजून ५९ मिनिटे.

प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे, असे म्हटले जाते. संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. 

‘असे’ करा आषाढ संकष्ट चतुर्थीचे पूजन

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते.  रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ १० वाजून ०३ मिनिटे
ठाणेरात्रौ १० वाजून ०३ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून ५९ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ १० वाजून ०० मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून ५८ मिनिटे
नाशिकरात्रौ १० वाजून ०० मिनिटे
अहिल्यानगररात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ५७ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे
वर्धारात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ५७ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून ५० मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ५३ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ४७ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०९ वाजून ५० मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ५९ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ५७ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ४७ मिनिटे

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीchaturmasचातुर्मासPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकganpatiगणपती 2024Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी