शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाचे वर्णन करताना तुकोबांनी सुंदर 'हे' ध्यान न म्हणता 'ते' ध्यान का म्हटले असावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 07:05 IST

Sant Tukaram Maharaj Sundar Te Dhyan Abhang: तुकोबांचा हा अभंग आणि लतादीदींचा प्रासादिक सुर ऐकताना विठूमाऊली नजरेसमोर येतेच. मात्र यात केलेला शब्दखेळ जाणून घेऊ.

जय हरी माऊली. आषाढी एकादशीचे (Ashadhi Ekadashi 2025) वेध सगळ्यांनाच लागले आहेत. काही जण वारीला निघाले आहेत तर काही जण मनाने पांडुरंगाचे स्मरण करत मानसपुजा करत आहेत. ती करत असताना जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग मुखी येतोच. काय प्रासादिक ओळी आहेत बघा. त्या गुणगुणताना विठुरायाचे सगुण रूप डोळ्यासमोर आपोआप उभे राहते. कसे आहे ते रूप?

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया।तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर,तेचि रूप।।मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणि विराजीत।।तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने।।या शब्दांबरोबर लता दीदींचा दैवी आवाज कानात घुमला नसेल तरच नवल. त्याला सुंदर संगीत साज चढवला आहे, संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. हा अभंग ऐकत असताना मन थेट विठुरायाच्या पायाशी पाहोचते आणि सुंदर रूप पाहताना आपलीही समाधिस्थ अवस्था होते. 

तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त. त्यांनी स्वत: निर्गुण भक्ती केली. परंतु, समाजाला भगवंत दाखवायचा, तर तो सगुण रूपात असायला हवा, म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे. 

विठुरायाच्या सान्निध्यात असणारे तुकोबा, या अभंगात वर्णन करताना सुंदर `ते' ध्यान म्हणत आहेत. `ते' ऐवजी `हे' हा शब्द त्यांना वापरता आला असता, परंतु त्यांनी सुंदर ते ध्यान असे म्हटले, या मागचा तर्क सांगताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर सांगतात, `पंढरीला भक्तांसाठी, घेऊनि कर कटी, भीमा निकटी' उभे राहिलेले हे सावळे परब्रह्म सगुण आहे. त्याचे ध्यान करताच ते आपल्यासमोर येते. या ध्यानाचा त्या ध्यानाशी असलेला संबंध दाखवताना तुकाराम महाराजांनी `हे' ऐवजी `ते' हा शब्द वापरला असावा.' 

म्हणूनच कदाचित आपणदेखील भगवंताच्या दर्शनाला गेलो असता, डोळे मिटून घेतो. किती हा विरोधाभास? ज्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत आपण ताटकळत उभे असतो, तो दर्शनाचा क्षण आला, `देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी' अशी अवस्था असताना मात्र आपण डोळे मिटून घेतो. कारण, आपल्या हृदयस्थ परमेश्वराची प्रतिमा आणि गाभाऱ्यात उभा असलेला विठोबा या दोन्ही प्रतिमा एकच आहेत ना, याची खात्री करून घेत असतो. ही तुलना, म्हणजेच तुकाराम महाराजांच्या लेखी `सुंदर ते ध्यान' आणि `सुंदर हे ध्यान' यातला फरक असेल.

संतरचना समजून घेणे अवघड. वरवर सोपे वाटणारे शब्द बरेच काही गूढ सांगून जातात. जसे की, वर केलेली शाब्दिक उकल. बाकी, उर्वरित अभंगात महाराजांनी त्यांना दिसलेला पांडुरंग कसा आहे, त्याचे वर्णन केले आहे. 

कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पांडुरंग, त्याच्या गळ्यात तुळशी माळ आणि कमरेभोवती पितांबर नेसले आहे. असे सोज्वळ, सात्विक रूप भक्तांना नेहमीच आवडते. त्याच्या कानात मत्स्य आकाराची कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ रत्न आहे. हे रूप सावळे असले, तरी हा सगळा श्रुंगार त्याला शोभून दिसत आहे. अशा रूपात विठ्ठलभक्त कायम रमू शकतो....!

विठुरायाचे रूप पाहून तुकाराम महाराजांची जी अवस्था होते, तशीच आपलीही अवस्था ही अभंगवाणी ऐकून होते. चला तर मग, दिवसाची मंगलमय सुरुवात करुया, मुखाने `जय हरी विठ्ठल' म्हणूया...!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीsant tukaramसंत तुकारामspiritualअध्यात्मिक