शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 07:05 IST

Ashadhi Ekadashi 2025 Vitthal Rukmini Darshan: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी झाली, त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे आज सोमवारी ७ जुलै रोजी शिळ्या विठोबाची भेट का घ्यावी ते जाणून घ्या.

शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, ऐकावं ते नवलंच! पण तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. शिळा विठोबा अशी संकल्पना आपण याआधी क्वचितच ऐकली असेल. पण जेव्हा आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या सान्निध्यात बसतो, तेव्हा अशा अनेक नवनवीन गोष्टींचा उलगडा होतो. तर आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन घेण्याआधी जाणून घेऊया या संकल्पनेबद्दल!

आषाढी एकादशीचा(Ashadhi Ekadashi 2025) दिवस तसा धामधुमीचा! पूर्वी लोक आषाढीचा उत्सव झाला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा विठ्ठल मंदिराच्या दिशेने जाताना दिसत. एवढ्या सकाळी ते तिथे का जात असावेत असा एका आजींना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, 'ते सगळे शिळ्या विठोबाचे दर्शन घ्यायला निघाले आहेत.' 

वास्तविक विठोबा कधीच नवा, जुना किंवा शिळा होत नसतो. तो कधीही बघा, राजस सुकुमारच दिसतो. मग शिळा विठोबा ही संकल्पना आली कुठून ? तर भोळ्या भक्तांच्या भोळ्या भावातून! भाविक मनुष्य जे जे आपल्याला आवडतं ते देवाला अर्पण करतो. मग ती शिळी भाकरी का असेना. संत देखील याच भोळ्या भावनेने देवाला न्हाऊ, माखू घालत, देवाचा साज शृंगार करत, देवाला नेसायला वस्त्र, झोपायला गादी, लोड, पांघरूण, जेवायला नानाविध पदार्थ असं सारं काही देत असत; नव्हे अर्पण करत असत. 

असाच हा शिळा विठोबा, त्यांच्या मनातला, संकल्पनेतला! जो आषाढीच्या दिवशी भक्तांची भेट घेऊन दमलेला असेल. दुसऱ्या दिवशी उशिरा उठला असेल आणि अशा वेळी त्या थकलेल्या विठोबाचा शीण घालवण्यासाठी त्याला पेलाभर पाणी, दूध, तुळशीची माळ अर्पण करून दर्शन घ्यावं, असा नियम भाविकांनी आखला असेल. म्हणून आषाढीच्या दिवशी विठोबाचे दर्शन तर घेतातच, पण दुसऱ्या दिवशी सकाळी दमलेल्या विठोबाचे अर्थात शिळ्या विठोबाचेही दर्शन घेतात. 

या छोट्याशा कृतीतून मोठा धडा मिळतो, तो म्हणजे माणुसकीचा! आपली संस्कृती केवळ मूर्तिपूजा शिकवत नाही तर मूर्तिपूजेतून माणुसकीची पूजा शिकवते. जशी विठोबाची चौकशी कराल तशी आपल्या माता पित्याची, सगे सोयऱ्यांची, आजूबाजूच्या लोकांची आपुलकीचे चौकशी करा. त्यांना हवं नको ते द्या. मृत्यूनंतर आपल्या नावे दानधर्म करण्याआधी जिवंतपणी शक्य तेवढी मदत करा. एकमेका सहाय्य्य करू, अवघे धरू सुपंथ!

'भोळा भाव आणि देवा मला पाव' असा सच्चा भाव बघून देव का बरे प्रसन्न होणार नाही? आजच्या बेगडी जगात एवढी निरागसता बघायला मिळत नाही. जिथे तिथे फोटो काढून आपल्या भाव भावनांचे प्रगटीकरण करायचे आणि जगाला दाखवायचे असा ट्रेंड आला आहे. मात्र आपली आजी, पणजी कुणी बघावं म्हणून नाही, तर आपल्याला जाऊन देवाला बघता यावं यासाठी देवदर्शन घेत असत. परिणामी देवाचेही त्यांच्याकडे लक्ष असे. आपणही तेवढा निर्मळ भाव आणण्याचा प्रयत्न करूया आणि (आता जमलं नाही तर जमेल तेव्हा) शिळ्या विठोबाचे दर्शन घेऊया. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर