शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:35 IST

Ashadhi Ekadashi 2025 Date: हिंदू धर्मात एकादशीचे महत्त्व आहेच, पण त्यात आषाढी एकादशीची पूजा विशेष मानली जाते आणि अनेक घरातून चतुर्मास पाळला जातो; त्याविषयी...

यंदा ६ जुलै रोजी देवशयनी तथा आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. या तिथीपासून चतुर्मासाची(Chaturmas 2025) सुरुवात होते आणि विविध सणांची रेलचेल सुरू होते. कार्तिकी एकादशीला(Kartiki Ekadashi 2025) चतुर्मासची सांगता होते. यंदा २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. या चार महिन्यात भगवान महाविष्णू क्षीरसागरात विश्रांति घेतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून आषाढी एकादशीला सर्व एकादशीची महाराणी म्हटले जाते. पाठोपाठ देवउठणी अर्थात कार्तिकी एकादशीचेही महत्त्व अधोरेखित केले जाते. वारीला सुरुवात झालेलीच आहे, त्यानिमित्ताने आषाढीच्या व्रताबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 

दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात, त्यांना वेगवेगळी नावे आहेत. आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले आहे. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात हाीते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते. लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात. विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते. या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता, महाएकादशी हे नाव सार्थक ठरते. 

भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्थ मानतो. ज्ञानोबा-तुकाराम या संतांनी धर्माचे लोण महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतो. या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे. परंतु उपासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे अयोग्य आहे. 

एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे, असे शास्त्र सांगते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला हरकत नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे, म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात. पुढील चार महिने वेगवेगळी पूजा, व्रत, पूजा, सण, उत्सव तसेच जपतपादि कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषवण्याचा प्रयत्न करतात.

आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यत: विठ्ठलाची पूजा करतात. पांडुरंगाच्या ठायी विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करतात. भजन, पूजन, कीर्तन, हरीकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहानथोर सहभागी होतात. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठलभक्तीचा तर नुसता सुकाळ असतो. विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जिवाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते. चंद्रभागेत स्नान करून मंडळी घरी परततात.

आषाढी एकादशीस चातुर्मासारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात. अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही व दह्याचे पदार्थ, अश्विन महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्य म्हणजे कडधान्य व्यर्ज्य करतात. काही जण चार महिने एकभुक्त राहतात, तर काही जण सुखशय्या व्यर्ज्य करतात. काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात. नित्य देवदर्शन, कथा कीर्तन, श्रवण, पूजा, अभिषेक, नदीस्नान असे अनेक नेमधर्म आचारण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Puja Vidhiपूजा विधीchaturmasचातुर्मासPandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सणspiritualअध्यात्मिक