शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Ashadhi Ekadashi 2023: हंपीच्या विठ्ठल मंदिरातून निघून पंढरपुरात का आले पांडुरंग? काय होते निमित्त? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:20 IST

Ashadhi Ekadashi 2023: कानडा राजा पंढरीचा किंवा कानडा हो विठ्ठलु या गाण्यात पंढरपूरच्या पांडुरंगाचे कर्नाटकाशी असलेले वर्णन आढळते, त्यामागेही कारण हेच!

भगवान श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार. त्यानंतरही भगवंतांनी अवतार घेतला पण शस्त्र हाती घेणार नाही असा निर्धार केला. केवळ संत सज्जनांच्या आग्रहापोटी ते विठ्ठल रूपात आले आणि कटेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले, अशी आख्यायिका सांगितली जाते. 

आजवर आपण सर्व हिंदू देव देवतांना शस्त्रासहित पाहिले आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहताना काही जणांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आपण `मूर्ती' कशालाही म्हणतो. खरे पाहता मूर्ती या भगवंताच्या असतात. कारण त्यांच्या हातात शस्त्रे असतात. ज्याच्या हातात शस्त्रे नसतील त्याला मूर्ती न म्हणता पुतळा किंवा शिल्प म्हणावे. तरीदेखील पांडुरंगाची मूर्ती त्याला अपवाद आहे. 

पांडुरंगाच्या हातात शस्त्र का नाहीत? तर भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागात आले होते. ते प्रथम कर्नाटकात आले व तेथून पुढे पंढरपुरात भक्त पुंडलिकाची भेट घेण्यास आले. म्हणून आजही हंपी येथे पुरातन विठ्ठल मंदिरं आहेत परंतु त्यात विठोबाची मूर्ती नाही. कारण तो तिथून पंढरपुरात गेला असे सांगितले जाते. भक्तांशी सदिच्छा भेटीला जाताना शस्त्रांची आवश्यकता नाही, या विचाराने पांडुरंग नि:शस्त्र आले. मात्र भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने वीट पुढे सरकवून तिथे थांब असे म्हणत प्रतिक्षा करण्यास सांगितले. त्यानुसार भक्ताच्या आज्ञेवरून पांडुरंग कटेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे.

भगवंताच्या रुपामध्ये फक्त पांडुरंग असे रूप आहे, की त्याच्या हातात शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत. पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे, की हातात शस्त्र नसले तरी त्याच्या संपूर्ण अंगावर ईश्वरी चिन्हे आहेत. म्हणून तर तेथे ईश्वरी शक्ती जाणवते.

आजपर्यंत अनेक संतांना ती अनुभवास आली आहे. पांडुरंगाच्या कोणत्याही हातात शस्त्र नसल्यानेच त्याच्या या रूपाला बौद्धरूप म्हणतात. येथील मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटेच उभे आहे व त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात रुख्मिणी, सत्यभामा व राही (राधिका) यांच्या मूर्ती आहेत.

भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व गोत सोडून पुढे आले आहेत व त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांचा शोध घेत तिथे आलेल्या दिसत आहेत. या तिघींच्या मूर्ती गंडकी पाषाणाच्या आहेत. 

विठ्ठलाचे हे रूप शिवस्वरूप आहे. कारण त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे. ही मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रगट झाली आहे. तिथे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात. व पंचामृताचाचा अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात.

भगवंताचे दर्शन घेण्यास आलेली भक्तमंडळी भगवंताच्या चरणावर डोके ठेवून पदस्पर्श करतात. भगवंताचे चैतन्य सतत तिथे जाणवते. कारण ही नि:शस्त्र मूर्ती क्षमाशील आहे. तिथे गेलेल्या प्रत्येकाला मन:शांतीची अनुभूती येते. 

पांडुरंगाचे रूप तिरुपतीसारखे आहे. ही मूर्तीदेखील लक्ष्मीपतीच आहे. ज्याच्याजवळ अनन्य भाव असतो, त्याच्यावर भगवंत दया करतो. म्हणून आपला अंतस्थ भाव कायम ठेवून पांडुरंगाचे दर्शन घेतले, तर तीच मूर्ती आपल्याला डोळे मिटल्यावर हृदयात स्थित असल्याची प्रचिती येते. तिचेच दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही २९ जून रोजी आषाढी एकादशीला भक्त भगवंत भेटीला पोहोचतील!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी