शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘या’ ३ पैकी तुमची बर्थडेट आहे? लक्ष्मी-कुबेर कृपा; धाडसी-मेहनती असतात, पैसे कमी पडत नाहीत! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:26 IST

Numerology: या व्यक्तींची कोणत्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन यश-प्रगती होऊ शकते? जाणून घ्या...

Numerology: नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राशीपरिवर्तन करत आहे. डिसेंबर महिन्यात बुध ग्रह वक्री होणार आहे. बुध ग्रह उत्तम बुद्धी, तर्कक्षमता कारक असल्याचे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक शास्त्र आहे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४ आणि २३ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ५ आहे. बुध हा मूलांक ५ चा स्वामी आहे.

पंचांग, नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. अंकशास्त्राच्या माध्यमातूनही भविष्यकथन करता येते. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींवर धनदेवता कुबेरांची विशेष कृपा असते. तसेच या मूलांकाच्या व्यक्तींना लक्ष्मी देवाची शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते. यामुळे पैशांची चणचण भासत नाही, आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. धनलाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. 

या व्यक्ती मनमिळावू आणि प्रतिभावान असतात

मूलांक ५ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव मनमिळाऊ असतो. या मूलांकाचे लोक प्रतिभावान असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जाण्यास तयार असतात आणि त्यात ते विजयही मिळवतात. धाडसी, निर्भयी आणि मेहनती असतात. ते कधीही हार मानत नाहीत आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात, असे मानले जाते. 

प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पद्धतीने करायला आवडते

मूलांक ५ असलेल्या व्यक्तींना भाग्याची आणि नशिबाची उत्तम साथ मिळते. यासह नेहमी पुढे जाण्याचा मार्ग शोधत असतात. कामात कोणाची ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते. या व्यक्ती बुद्धिमान असतात. लहान वयात ते मोठ्या हुद्यावर पोहोचतात. कामे करून घेण्यात या व्यक्ती पटाईत असतात. जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. पैशाची कधीच कमतरता नसते. ते पहिल्यापासूनच त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत असतात.

तर्क क्षमता अन् संवाद कौशल्य चांगले असते

मूलांक ५ असलेल्या व्यक्ती खूप आकर्षक असतात. बुध वाणीचा कारक मानला गेला आहे. आपल्या बोलण्याने वाणीमुळे समोरच्या व्यक्तींवर प्रभाव पडतो. तर्क करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य खूप चांगले असते. जनसंपर्क, मित्र परिवार खूप मोठा असतो. कौटुंबिक जीवनही आनंदी असते, असे म्हटले जाते. 

कोणत्या क्षेत्रात उत्तुंग भरारी, यश-प्रगती होते?

मूलांक ५ असलेल्या लोकांना व्यापार, उद्योगात चांगले यश मिळते. हे लोक मनी माइंडेड आणि बिझनेस माइंडेड असतात. व्यवसायात जोखीम पत्करायला ते नेहमीच तयार असतात. नवीन योजनांवर काम करून नफा कमावतात. आव्हाने स्वीकारतात आणि कोणत्याही परस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करतात.  बँकिंग, शिक्षण, प्रशिक्षण या क्षेत्रात करिअर करू शकतात. या व्यक्तींना अर्थशास्त्र आणि संगीताचेही चांगले ज्ञान असते, असे सांगितले जाते. 

- सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते. 

 

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष