शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अनंत चतुर्दशी: व्रत शक्य नाही? १५ मिनिटांत होणारे प्रभावी स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 14:28 IST

Anant Chaturdashi Vrat 2024: अनंताचे व्रताचरण सोपे नाही. तितकेच पुण्य मिळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेलेले स्तोत्र पठण किंवा आवर्जून श्रवण करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या, अनेकविध लाभ...

Anant Chaturdashi Vrat 2024: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व लाभलेला चातुर्मास काळ सुरू आहे. भाद्रपद महिन्याच्या पूर्वार्धाची सांगता होऊन आता उत्तरार्ध सुरू होत आहे. लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता अनंत चतुर्दशीला बाप्पााला निरोप दिला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रीविष्णूंचे विशेष व्रत केले जाते. यंदा, मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी आहे. 

भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला 'अनंत चतुर्दशी'चे व्रत केले जाते. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत सर्व मंडळी करत नाहीत. कारण हा एक वसा अहे. तो आचरणात आणणे काहीसे कठीण आहे. अनंताचे व्रत हे पुरुषांनी करावयाचे काम्य व्रत आहे. हे व्रत सलग १४ वर्षे करावे लागते. गेलेले वैभव परत मिळावे म्हणून हे व्रत करण्याची प्रथा आहे. एखाद्या वडीलधाऱ्या अधिकारी व्यक्तीने हे व्रत सांगितल्यास अथवा अनंताचा दोरा अचानक सापडल्यास हे व्रत केले जाते. तसेच ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे तेदेखील हे व्रत करू शकतात. परंतु, एकदा हे व्रत करण्यास प्रारंभ केला की, ते कुळामध्ये अखंडितपणे केले जाते. चौदा वर्षांनंतर उद्यापन करून न थांबता, पुन्हा ते चालूच ठेवले जाते. 

व्रत शक्य नाही? काळजी नसावी; ‘हे’ प्रभावी स्तोत्र म्हणा

अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू यांच्या अनंत अवताराची पूजा केली जाते. हे व्रत करणे सर्वांना शक्य होतेच असे नाही. हे व्रताचरण कठीणही आहे. परंतु, काळजी करू नका. शास्त्रानुसार, व्रत पूजा करणे शक्य नसेल तर श्रीविष्णूंचे स्तोत्र आवर्जून म्हणावे. एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या सहस्र नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. श्रीविष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र म्हटले जाते. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. 

महाभारत आणि विष्णुसहस्रनाम

शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठीराने विचारले की, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता, मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या दैवताचा जप केला, तर मनुष्य जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो? त्यावर भीष्माचार्य म्हणाले की, भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता, मनुष्य हरतऱ्हेच्या दु:खावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे. मन:शांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भिष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्ण तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते. 

विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य अन् महत्त्व

श्री विष्णूसहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूच्या एक हजार नावांचे स्तोत्र होय. वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे. श्रीविष्णू पूजनात विष्णूला अभिषेक करताना हे स्तोत्र म्हणले जाते. सत्यनारायण पूजेच्या वेळी हे स्तोत्र म्हणून श्री बाळकृष्ण अथवा शाळीग्राम यांना अभिषेक केला जातो. यात भगवान श्रीविष्णूंची भूतात्मा, हिरण्यगर्भ, मनु, पूतात्मा अशी वैदिक नावे यात दिसतात. त्याच जोडीने रुद्र, शंभू अशी काही श्रीशंकराची नावेही यात दिसतात. शिव आणि श्रीविष्णू या देवतांचे ऐक्य दाखविण्यासाठी अशी नावे आलेली आहेत, असे मत काही अभ्यासक नोंदवतात.

विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे अनन्य साधारण लाभ

- ज्यांना सवय आहे, त्यांचे हे स्तोत्र सुमारे १५ मिनिटांत म्हणून पूर्ण होऊ शकते. परंतु, ज्यांना हे स्तोत्र म्हणणे शक्य नाही, त्यांनी आवर्जून एकचित्त होऊन मनोभावे श्रवण करावे.

- लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी व्यापारी समाजात या स्तोत्राचे महत्त्व विशेष आहे.

- जीवनातील विविध संकटांवर मात करण्यासाठी या स्तोत्राचे पठन करण्याची प्रथा आणि श्रद्धा दिसून येते.

- या स्तोत्राच्या प्रास्ताविकात जो श्लोक आलेला आहे त्यात म्हणले आहे की, महापुरुष श्र विष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली आहेत, ती मला ऐश्वर्य प्राप्ती व्हावी म्हणून मी कथन करीत आहे. 

- महर्षी व्यास यांनी सांगितले आहे की, जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. 

- विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्याने आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. 

- गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. 

- ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.

- लांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो, असे सांगितले जाते.

- जगद्गुरु शंकराचार्य या स्तोत्राला दुजोरा देताना म्हणतात की, भगवद्गीता आणि विष्णुसहस्रनामाचे पारायण करा. भगवंताचे चिंतन करा. सत्संग करा. दीनजनांना दान करा. 

।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।। 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास