शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आनंद तरंग: मन वढाय वढाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 03:41 IST

मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची अतुलनीय छाप सोडणारे खलनायक अभिनेते निळू फुले यांना बघताच क्षणी लोकांनी पायातल्या चपला, जोडे, पायताण फेकून मारलं. इतकं त्यांच्या अभिनयाशी लोकांचं मन एकरूप झालेलं होतं.

सुजाता पाटीलबहिणाबाई म्हणतात, ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर! किती हाकलं हाकलं फिरी येतं पिकावर’ म्हणजे हे मन कसं आहे माहीत आहे का? फसवं. मृगजळासारखं. रूप, गंध, आकार नाही. तरीही ते आपल्यासोबत सदैव असतं. ज्याचं मन निरोगी तो मनुष्य यशस्वी. ज्याचं मन कमकुवत त्याला हळूहळू शारीरिक व्याधीही होतात. इंद्रधनुष्याप्रमाणे मनही एकाचवेळी अनेक रंग आपल्या अंगा-खांद्यांवर घेऊन मिरवत असतं. आणि इथेच आपण थोडं बावचळतो. स्वत:चा खरा रंग शोधण्यात. मनाचेही अनेक प्रकार. दुर्योधनासारखे वैशी मन, त्याउलट श्रीकृष्णासारखं रक्षित मन, एक जीव घेणारं मन, तर दुसरीकडे जीवनदान देणारं. आभासी मन. मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची अतुलनीय छाप सोडणारे खलनायक अभिनेते निळू फुले यांना बघताच क्षणी लोकांनी पायातल्या चपला, जोडे, पायताण फेकून मारलं. इतकं त्यांच्या अभिनयाशी लोकांचं मन एकरूप झालेलं होतं. तुम्हाला माहीत आहे राष्ट्रांनाही मन असतं? उदाहरणार्थ स्वीत्झर्लंडचं नाव काढताच आपल्या मनाचा पिसारा अगदी आनंदून, फुलून जातो. आपण प्रत्यक्ष जरी हे ठिकाण पाहिलेलं नसलं तरी आजतागायतच्या वर्णनातून आपलं मन तिथे गुंतलेलं असतं; परंतु पाकिस्तानचं नाव काढताच आपलं मन खवळून उठतं. कारण, मनाला भावनांच्या संवेदना पोहोचतात व त्या पद्धतीने ते व्यक्त होतं. जगावर दादागिरी करणाऱ्या अमेरिकेविषयी आपलं मनही कुरबुरतं. कठीणसमयी मदतीला धावून येणाºया रशियाच्या यशाबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदराची भावना उफाळून येत. आताचं ताजं उदाहरण घ्या. संपूर्ण जगाला कोरोनासारख्या महामारीमध्ये ढकलणाºया, उद्दामपणे गलवान खोºयात घुसखोरी करणाºया चीनबद्दल मन संतापाने पेटून उठतं. आपण जसे मनावर संस्कार करू त्यापद्धतीने ते आपली दिशा बदलत राहतं. आता मनाची गाडी खड्ड्यात न्यायची का इच्छितस्थळी, ते सर्वस्वी आपण ठरवायचं....!!