सण, उत्सवाच्या वातावरणाने आनंद होतो, पण आनंद साजरा करण्यासाठी सणांची वाट का बघायची? असा प्रश्न ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै विचारतात आणि त्यावर सुंदर उत्तरही देतात.
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
ते म्हणतात, 'आनंद वाटण्यासाठी कोणत्या सणाची वाट का बघायची? दसऱ्याला आपण सोने वाटतो, म्हणजे सुख वाटतो. त्यासाठी आपट्याची पाने हवीत असे नाही, कारण आपल्याला निसर्ग संवर्धन करायचे आहे. तसेच, केवळ दसऱ्यालाच शुभेच्छा द्यायच्या असेही नाही. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, `प्रत्येक क्षण हा सण झाला पाहिजे.' म्हणजेच प्रत्येक क्षणात सुखी, समाधानी, आनंदी राहिले पाहिजे. तो दुसऱ्यांसाठी वापरला पाहिजे. निसर्गाची जपणूक आपणच केली पाहिजे. 'क्षणाक्षणाला शुभचिंतन करणे, हे जीवनविद्येचे सार आहे.' म्हणून प्रार्थना आहे,
'हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे....'
आपल्या मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर त्याचे मोठे फायदे होतील. आजचे सगळे ताणतणाव हे स्वकेंद्री झाल्यामुळे आहेत, ते सर्वकेंद्री झाले, तर आपोआप दूर होतील. मनाला मोठे केल्याशिवाय तुम्ही मोठे होणार नाही, हा निसर्गाचा नियम आहे. मन जेवढे व्यापक होईल, तेवढे तुम्ही ईश्वराच्या जवळ जाता. सर्वांचा विचार करायचा म्हणजे, सर्वांना मदत करायला जाण्याची गरज नाही, परंतु त्यांचे चांगले व्हावे, हा सर्वव्यापी विचार आपल्याला सर्वांसाठी रोजच करता येईल.
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
आपल्या कामाने केवळ आपला विकास, हे ध्येय न ठेवता राष्ट्रविकास हा उद्देश ठेवला पाहिजे. त्यामुळे आपणच इतरांची, निसर्गाची हानी कधीच करणार नाही. विशेषतः तरुणांनी चार गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत,
>> कामात झोकून द्या - मनापासून, कर्तव्यभावनेने काम करायचं. त्यातून सर्वांना आनंद मिळाला पाहिजे, हा विचार असला पाहिजे. >> कौशल्य - कामाचा रतीब टाकू नका. मन लावून, जबाबदारीने काम करा. >> सहानुभूती - आपल्या बरोबर काम करणाऱ्यांबद्दल प्रेम आणि सहानुभूती असली पाहिजे. कृतज्ञ भाव असले पाहिजे. >> शुभचिंतन - माझे भले होत आहे, तसे इतरांचेही होवो, ही भावना असायला हवी.
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
या चार गोष्टी केल्या, तर तुमची भरभराट नक्कीच होईल. जगायचेच आहे, तर फक्त स्वत:साठी जगू नका, सर्वांसाठी जगा. सकाळी उठून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि त्यांचे शुभचिंतन करा. या छोट्याशा कृतीने आयुष्यात फरक पडेल आणि प्रत्येक क्षण हा सण वाटेल!
Web Summary : Why wait for festivals to be happy? Prahlad Pai emphasizes finding joy in every moment, practicing kindness, and wishing well for others. Focus on contributing to national progress and cultivating gratitude for a fulfilling life. Live not just for yourself, but for all.
Web Summary : खुश रहने के लिए त्योहारों का इंतजार क्यों करें? प्रहलाद पै हर पल में आनंद खोजने, दया का अभ्यास करने और दूसरों के लिए शुभकामनाएं देने पर जोर देते हैं। राष्ट्रीय प्रगति में योगदान देने और एक संतुष्ट जीवन के लिए कृतज्ञता पैदा करने पर ध्यान दें। केवल अपने लिए नहीं, सभी के लिए जिएं।