शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

समस्त प्रेमवीरांनो, सावधान! तुम्ही ९९ क्लबचे सभासद होऊ नका! - गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:25 IST

तुमच्या नात्यात दुफळी माजण्यासाठी कोणतेही १ कारण पुरेसे ठरते. तुमचे प्रेम हिरावून घेवू शकते. त्या कलहाला आमंत्रण देऊ नका. अन्यथा जे आहे तेदेखील गमावून बसाल. 

प्रेम ही अतिशय सुंदर भावना. जपून वापरली तर आयुष्यभराचा आनंद. परंतु त्याला अपेक्षा जोडली गेली, की प्रेमाचा अंत होतो आणि वादाला तोंड फुटते. प्रेम संपुष्टात येण्याची अनेक कारणे आहेत, पैकी एका कारणाकडे लक्ष वेधून घेताना प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास एक गोष्ट सांगतात आणि सावधही करतात, की तुम्ही त्या गोष्टीचा एक भाग बनू नका. ती गोष्ट कोणती ते पाहू.

एकदा एक राजा आपल्या प्रधानासह राज्याचा फेरफटका मारण्यासाठी वेषांतर करून निघाला. राज्यात सगळी आलबेल होती. समाजव्यवस्था सक्षम होती. संरक्षणव्यवस्थाही चोख होती.  राजा समाधानाने पुढे जात असताना एक कुटुंब त्याच्या नजरेस पडले. तिथे नवरा बायको दोघेही गाणी गात आनंदाने कुंभारकाम करत होती. गरीब कुटुंब असूनही त्यांच्या घरात एवढा आनंद पाहून राजा प्रधानाला म्हणाला, माझ्याकडे सगळे वैभव असूनही माझ्या घरात आनंद नाही तेवढा आनंद या गरीब कुटुंबात कसा?प्रधान म्हणाले, राजन, कारण हे कुटुंब अजून ९९ व्यवस्थेचे सभासद नाहीत. राजा गोंधळला. प्रधान म्हणाला, आपण मला ९९ सुवर्णमुद्रा द्याव्यात. त्या मी या गरीब घरात देण्याची व्यवस्था करतो. त्यानंतर सहा महिने या कुटुंबाचे निरीक्षण करा आणि फरक बघा.

राजाने प्रधानाला सुवर्ण मुद्रा दिल्या. प्रधानाने एका रात्री त्या घराच्या दारासमोर सुवर्ण मुद्रांची थैली ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी कुंभार बाहेर आला तर त्याला ती थैली दिसली. त्याने थैलीत डोकावून पाहिले. तो चक्रावला. पटकन आत गेला, दार लावले, मोहरा मोजल्या. ९९ मोहराच कशा? देणाऱ्याने १०० मोहरा दिल्या असल्या पाहिजेत. कदाचित उत्सुकतेमुळे माझा हिशोब चुकत असावा. असे म्हणत त्याने बायकोला मोहरा मोजायला दिल्या. तिनेही ९९ असल्याचे सांगितले. मुलांना मोजायला लावल्या त्यांनीही ९९ असल्याचे सांगितले. कुंभार बेचैन झाला. सुवर्ण मोहरा मिळाल्याचा आनंद होताच, पण एक मोहोर कमी असल्याने तो अस्वस्थ झाला. इरेला पेटला आणि एक मुद्रा कमवून १०० चा आकडा पूर्ण करण्याचा त्याने चंग बांधला.

तो दिवस रात्र मेहनत करून, रक्ताचे पाणी करून पैसे कमवत असे. १ मुद्रा कमवण्याच्या नादात तो वेडापिसा झाला. १ मुद्रा कमवणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. हे जाणून त्याच्या बायकोने विचार केला, लक्ष्मी दाराशी आली आहे तर तिचा उपभोग घ्यायचा सोडून नवरा दु:खं करत बसला आहे. आपण मात्र तसे करायचे नाही. सुख मिळाले आहे तर उपभोगायचे. असे ठरवून तिने दोन मोहरा खर्च केल्या. आईचे पाहून मुलांनीसुद्धा दोन मोहरा खर्च करून चैन केली. कुंभार दर रात्री मोहरा मोजत असल्याने एकाएक चार मोहरा गायब झाल्याने त्याने आकांडतांडव केला. बायको मुलांना जाब विचारला. कधी नव्हे ते त्यांच्या घरात वादावाद झाले. आणि त्यांच्या घरातली सुख, शांती, समाधान संपुष्टात आले.

प्रधानाने राजाला सांगितले, राजन हाच तो ९९ चा गट आहे. मनुष्य थोडक्यात समाधानी असतो, तोवर आनंदी असतो, परंतु अतिहव्यासापोटी तो प्रेम, शांतता, आनंद सगळे काही गमावून बसतो. 

म्हणून प्रेमवीरांनो, तुमच्या नात्यात दुफळी माजण्यासाठी १ मोहोर पुरेशी ठरू शकते. कोणतेही १ कारण तुमचे प्रेम हिरावून घेवू शकते. त्या कलहाला आमंत्रण देऊ नका. अन्यथा जे आहे तेदेखील गमावून बसाल. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेRelationship Tipsरिलेशनशिप