शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:28 IST

Akshaya Tritiya 2026 Date: २०२६ मध्ये अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या सोने खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त, तिथी आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व!

Akshay Tritiya 2026 Date: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस केवळ सोने खरेदीसाठीच नाही, तर नवीन कार्यारंभासाठी देखील अत्यंत फलदायी ठरणारा मानला जातो. २०२६ मध्ये अक्षय्य तृतीया कधी आहे आणि शुभ मुहूर्त कोणता आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

हे ही वाचा : Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत

'अक्षय्य' म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असे. वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा होणारा हा सण जीवनात सुख, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय्य राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

१. अक्षय्य तृतीया तिथी (Akshaya Tritiya Tithi)

२०२६ मध्ये अक्षय तृतीया रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी केली जाईल.

तृतीया तिथी प्रारंभ: १९  एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.४९ मिनिटांनी सुरु होईल 

तृतीया तिथी समाप्ती: २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी. ७.२६ मिनिटांनी संपेल. 

२. अक्षय्य तृतीया १९ तारखेला साजरी करण्याचे कारण :

हिंदू सण तिथीनुसार साजरे केले जातात. कोणतीही ज्या तारखेचा सूर्योदय पाहते ती तिथी त्यादिवशी असलेल्या सणासाठी ग्राह्य धरली जाते. 

यंदा अक्षय्य तृतीया तिथी १९ ला नाही तर २० एप्रिलचा सूर्योदय पाहणार आहे, तसे असूनही १९ ला च अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल. 

कारण, हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो, खरेदीसाठीही सकाळची वेळ योग्य मानली जाते. 

अशातच तृतीया तिथी २० तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच, म्हणजे ७.२६ मिनिटांनी ती संपणार आहे. 

त्यामुळे मुख्य सण १९ ला साजरा केला जाईल.  यालाच पूर्वाह्य व्यापिनी तथा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असे म्हणतात. 

हे ही वाचा : Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!

३. सोने खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya 2026 Shubh Muhurat)

अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. १९ एप्रिल रोजी सोने खरेदीसाठी खालील वेळा अत्यंत फलदायी ठरतील:

सकाळचा मुहूर्त: सकाळी ६:१० ते दुपारी १२:२५ पर्यंत.

संध्याकाळचा मुहूर्त: दुपारी ४:३० ते सायंकाळी ७:०० पर्यंत.

४. या दिवसाचे धार्मिक महत्त्व (Akshaya Tritiya 2026 Importance)

परशुराम जयंती: याच दिवशी भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता.

त्रेतायुगाचा प्रारंभ: धार्मिक मान्यतेनुसार, त्रेतायुगाची सुरुवात याच दिवशी झाली होती.

गंगावतरण: या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते.

हे ही वाचा : Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?

५. काय करावे आणि काय टाळावे? ((Akshaya Tritiya 2026 Rituals)

दान-धर्म: या दिवशी गरजूंना पाणी भरलेला कलश, छत्री, पंखा किंवा अन्नाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो.

नवीन सुरुवात: गृहप्रवेश, लग्न किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे.

नकारात्मकता टाळा: या दिवशी कोणाशीही वाद घालू नका किंवा घरात भांडणे करू नका, कारण या दिवशीची ऊर्जा वर्षभर तुमच्या सोबत राहते.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaya Tritiya 2026: Date, auspicious time for gold purchase explained.

Web Summary : Akshaya Tritiya 2026 falls on April 19th. The day is auspicious for new beginnings and gold purchases. The most auspicious times for buying gold are in the morning and evening. Donate to the needy and avoid negativity for prosperity.
टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीGoldसोनं