शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:44 IST

Akshaya Tritiya 2025:३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, या दिवसाला एवढे महत्त्व येण्याची वेगवेगळी कारणं जाणून घ्या, जेणेकरून आपण हा सण का साजरा करतो हे कळेल!

अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शुभ कार्ये केली जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय्य तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी ३० एप्रिल २०२५  रोजी अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2025) येत आहे. त्याची शुभ वेळ, महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागचे कारण जाणून घेऊया. 

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

अक्षय्य तृतीयेचा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते. तसेच संपत्तीत वाढ होते.

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..

अक्षय्य तृतीया साजरी करण्याची कारणे

>> पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. 

>> दुसर्‍या मान्यतेनुसार, या दिवशी भगीरथच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली.

>> तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे, असे सांगितले जाते. 

>> अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते. या कारणास्तव अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते.

>> महर्षी वेद व्यास यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले. या ग्रंथात श्री भगवद्गीतादेखील समाविष्ट आहे. असे मानले जाते की या दिवशी  गीतेच्या १८ व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे.

>> नर-नारायण देखील अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते. म्हणूनच ते शुभ मानले जाते.

>> महाभारतानुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात 'अक्षय्य पात्र' दिले होते. अक्षय्य पात्र कधीच रिकामे नसते. ते नेहमी अन्नाने भरलेले असते, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे. 

>> अशी अक्षय्य संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षय्यपणे टिकून राहावा यासाठी अक्षय्य तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाAstrologyफलज्योतिष