शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Aja Ekadashi 2024: तुळशीची वाढ चांगली व्हावी म्हणून अजा एकादशीनिमित्त जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 07:00 IST

Aja Ekadashi 2024: यंदा २९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे, त्यादिवशी विष्णू, लक्ष्मी आणि तुळशीची पूजा करताना लक्षात ठेवा पुढील गोष्टी!

हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळशीचे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहित आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानले जाते. ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दु:खं, दारिद्रय कायमचे निघून जाते. यासाठी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असतेच. 

परंतु तुळशीचे काही नियम आहेत. त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशिर्वाद तुम्हाला कायम लाभेल. म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका अन्यथा आर्थिक अडचणी, आरोग्याची हेळसांड, प्रगतीत अडथळे इ गोष्टी भेडसावतील!  २९ ऑगस्ट रोजी श्रावणातली अजा एकादशी आहे, त्यानिमित्त पुढील टिप्स जाणून घेऊ. 

>> तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका. येत्या सोमवारी एकादशी असल्याने हे दोन्ही दिवस सलग येत आहेत. त्यामुळे दोन दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही, अशा बेताने ठिबक सिंचन सदृश सोय करून ठेवावी. 

>> या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते, उपास करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रतभंग होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. 

>> तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे. मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे. परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे. 

>> कुंडीतून पाणी झिरपेल अशा बेताने दोन छिद्र पाडावीत. तुळशीचे र लावताना कुंडीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा. तसेच भुसभुशीत माती, वाळू आणि कोरडे शेण एकत्र करून कुंडीत पसरवून घ्यावा. यात मातीचे प्रमाण सत्तर टक्के, वाळूचे प्रमाण पंधरा टक्के आणि शेणाचे प्रमाण पंधरा टक्के असावे. 

>> तुळशीचे रोप निवडताना त्याची पाने चांगली तपासून घ्यावीत. पाने मोठी, छान आणि हिरवीगार असतील आणि त्याला मोहोर असेल, तर ती तुळस चांगली मानली जाते. अशा तुळशीला प्लॅस्टिक आवरणातून बाहेर काढून कुंडीतील मातीत रुजवावे आणि वरून आणखी एक मातीचा थर रचावा व पहिल्या वेळेस व्यवस्थित पाणी टाकून घ्यावे आणि नंतर थोडे थोडे पाणी टाकत राहावे. यात कोकोपीटचाही वापर करता येईल. 

>> तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. अपुऱ्या सूर्य प्रकाशाअभावी तुळशीचे रोपटे मलूल होते आणि त्याची अन्न निर्मिती प्रक्रिया थांबते. काही काळातच रोपटे मान टाकते. म्हणून तुळशीचे रोप सूर्य प्रकाश मिळेल अशा जागी लावावे. 

>> तुळशीला कीड पटकन लागते. यासाठी दर वीस-बावीस दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा. हा फवारा केल्यानंतर एक दोन दिवसानंतर तुळशीची पाने धुवून मगच वापरावीत.

>> गोवऱ्यांचा एक तुकडा पाण्यात एक दिवसभर भिजवून ते पाणी महिन्यातून एक दोनदा तुळशीला घालावे. तुळशीला आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतात. 

>> तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकावा. मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पाने अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक बहरते, फोफावते. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३