शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

Adhik Maas 2023 कमला एकादशी: शुभ योगात करा पूजन; मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 12:29 IST

Adhik Maas Purushottam Ekadashi 2023: कमला एकादशीचे व्रताचरण, पूजन अतिशय शुभ व लाभदायक मानले गेले आहे.

Adhik Maas 2023: चातुर्मासातील अधिक श्रावण महिना सुरू आहे. अधिक मास सांगतेकडे आला आहे. सुमारे तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचे महत्त्व अनन्य साधारण मानले गेले आहे. अधिक मास श्रीविष्णूंना समर्पित आहे. पुरुषोत्तम मासातील दुसरी म्हणजेच वद्य पक्षातील एकादशी शनिवार, १२ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. विशेष म्हणजे या दिवशी हर्ष नामक अतिशय शुभ मानला गेलेला योग जुळून येत आहे. या कमला एकादशीचा मुहूर्त, महत्त्व, मान्यता आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊया...

श्रावण अधिक आल्यामुळे यंदा २६ एकादशी व्रताचरणाचे पुण्य मिळणार आहे. दुसरे म्हणजे अधिक महिन्याची एकादशी ही दुग्ध-शर्करा योगाची मानली गेली आहे. कारण एकादशी आणि अधिक महिना दोन्ही श्रीविष्णूंना समर्पित असतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. पुरुषोत्तम महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशी या कमला एकादशी या नावाने ओळखल्या जातात. नियमित वर्षांमध्ये २४ एकादशी येतात. मात्र, यंदा अधिक महिना आल्यामुळे वर्षभरात येणाऱ्या एकादशीची संख्या २६ झाली असून, या कमला एकादशीचे व्रताचरण, पूजन अतिशय शुभ व लाभदायक मानले गेले आहे.

कमला एकादशीचे महत्त्व

वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. कमला एकादशी दिनी केलेल्या व्रतपूजनाचे विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व मोक्ष मिळू शकतो, अशी मान्यता आहे. अधिक महिना श्रीविष्णूंचा प्रिय महिना असल्याचे सांगितले जाते. पुरुषोत्तम एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना स्वर्ण दान आणि हजार यज्ञाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. तसेच पुरुषोत्तम एकादशीचे यशस्वी व्रताचरणामुळे मोक्षप्राप्ती होते. मनोकामना, प्रबळ इच्छा पूर्ण होतात. श्रीविष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. श्रीविष्णूंसह महालक्ष्मी देवीची कृपादृष्टीही राहते. त्यामुळे श्रीविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कमला एकादशीचे व्रत आवर्जुन आचरावे. पुरुषोत्तम महिना तीन वर्षातून एकदा येत असल्यामुळे अशी सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुण्यप्राप्तीचे लाभ मिळण्यासाठी कमला एकादशी व्रत करावे, असे सांगितले जाते.

कमला एकादशीचे व्रतपूजन

कमला एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर कमला एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यावेळी पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा आवर्जुन वापर करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू चालीसा, विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.

कमला एकादशीचे व्रतपूजनाची सांगता

कमला एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.

 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाspiritualअध्यात्मिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम