शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 15, 2020 07:30 IST

Adhik Maas 2020: माऊलींना अभिप्रेत असलेला स्वधर्म कोणता, तर मनुष्यनिर्मित नाही, तर ईश्वरनिर्मित. तो म्हणजे 'मानवता' धर्म.

ठळक मुद्देआपण ईश्वराचेच अंश आहोत. त्यामुळे प्रत्येक देहातील आत्म्याचा सन्मान करणे, हा आपला मानव धर्म आहे. सर्वांची सोयरीक जुळली, की 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना जागृत होईल आणि सर्व सुखी होतील.

ज्योत्स्ना गाडगीळ 

संत वाङमयाची ताकदच एवढी आहे, की ते वाचताना आपण आपल्या मनाशी हितगुज करत आहोत की काय, असा भास होतो. आता माऊलींचे पसायदानच पहा ना, ते म्हणतात, 

दूरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात।।

आपल्या सभोवती, परिसरात, गावात, शहरात, देशात, जगात काहीही वाईट घडत असले, तर आपले संवेदनशील मन विव्हळते. मनोमन आपले हात त्या दीनांसाठी जोडले जातात. त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होवो, अशी आपण प्रार्थना करतो. तीच भावना माऊली पसायदानात व्यक्त करतात. फरक एवढाच, की आपण चांगल्या लोकांचे भले होवो म्हणून प्रार्थना करतो, परंतु माऊली वाईट लोकांचेही भले होवो, असे म्हणतात. त्यांच्या आयुष्यातील तिमीर म्हणजे अंधार दूर झाला, तर लख्ख प्रकाशात वाईट काम करण्यासाठी ते धजावणार नाहीत. इतर लोकांप्रमाणे तेही सन्मार्गाला लागतील. 

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

याठिकाणी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट अशी, की आईला आपली सगळी लेकरे सारखी असतात. मुल हुशार असो किंवा ढ, गरीब असो नाहीतर श्रीमंत, सुदृढ असो नाहीतर आजारी, ती प्रत्येकावर समान माया करते. तोच भाव संत ज्ञानेश्वरांच्या ठायी दिसून येतो, म्हणूनच तर त्यांना 'माऊली' म्हटले जाते. त्या वत्सल भावनेने ते दुरितांचे तिमिर जावो, असे म्हणत आहेत. 

माऊलींना अभिप्रेत असलेला स्वधर्म कोणता, तर मनुष्यनिर्मित नाही, तर ईश्वरनिर्मित. तो म्हणजे 'मानवता' धर्म. सद्यस्थितीत प्रत्येकाला त्याचाच विसर पडत चालला आहे. परंतु, आपण सगळे देहाने वेगवेगळे असलो, तरी आत्मा एकच आहोत. आपण ईश्वराचेच अंश आहोत. त्यामुळे प्रत्येक देहातील आत्म्याचा सन्मान करणे, हा आपला मानव धर्म आहे. सूर्य ज्याप्रमाणे तळपत राहतो, तसा सत्वृत्तीने सारा समाज उजळू निघेल. सर्व प्राणीमात्रांना परस्परांप्रती स्नेह, भूतदया, प्रेम वाटले पाहिजे आणि मैत्र, सख्य निर्माण झाले पाहिजे. 

वर्षत सकळमंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी,अनवरत भूमंडळी, भेट तू भूता।।

'जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत' ही आपल्या संतांची शिकवण आहे. प्रत्येक जिवात्म्यामध्ये ईश्वराचा वास आहे, ही जाणीव जेव्हा होते, तेव्हा त्यांच्याप्रती वाईट विचार मनात येत नाहीत. असे अशी सद्भावना निर्माण झाली, की रामराज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. हा समाज, जणू ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वाटू लागेल. 

चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,बोलते जे अर्णव, पियुषाचे।।

कल्पतरू म्हणजे असा वृक्ष, जो सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि चिंतामणी म्हणजे असा मणी, जो आपण जे चिंतन करू, त्या गोष्टींची पूर्तता करतो. माऊली म्हणतात, ज्यावेळी समाजात भूतदया निर्माण होईल, त्यावेळी ते गावच चिंतामणींनी युक्त असेल. तिथे कल्पतरुंचे आरव म्हणजे आवाज असतील. कल्पतरूंच्या रूपाने चैतन्य सळसळत असेल. हर तऱ्हेने केवळ समृद्धी तेथे वास करेल. तसेच पियुषांचे अर्णव म्हणजे अमृतसागर असेल, अशा ठिकाणी कोणाचीच, कुठलीच उपेक्षा होणार नाही. 

चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन,ते सर्वाही सदासज्जन, सोयरे होतु।।

माऊलींचे काव्य लालित्य येथे ठळकपणे दिसून येते. जे सर्वसामान्य दृष्टीला दिसत नाही, ती दूरदृष्टी कवींच्या ठायी असते. माऊलीसुद्धा त्याच दूरदृष्टीने म्हणतात, अशा कल्पतरुंच्या गावात योगीजनांचा एवढा सुकाळू असेल, की तिथले लोक सूर्यासारखे ज्ञानाने तळपणारे असतील, परंतु त्यांच्या प्रखरतेचा कोणालाही त्रास होणार नाही. तिथले लोक स्वभावाने चंद्रासारखे शीतल असतील, परंतु, त्यांच्या चारित्र्यावर कोणतेही लांछन नसेल. त्यामुळे आपोआपच सर्वांची सोयरीक जुळलेली असते. सोयरीक जुळली, की 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना जागृत होईल आणि सर्व सुखी होतील. हेच पुढच्या ओवीत माऊली सांगतात. त्याचा भावार्थ पुढच्या भागात पाहू...!

जय हरी माऊली!

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात कोणता जप, कसा आणि किती करावा?

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना