प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांचे प्रवचन आणि विचार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत असतात. कौटुंबिक जीवन, अध्यात्म आणि चारित्र्य यावर ते अतिशय स्पष्टपणे मार्गदर्शन करतात. "सांसारिक जीवनात राहूनही ब्रह्मचर्याचे पालन कसे करावे?" यावर त्यांनी केलेले मार्गदर्शन गृहस्थाश्रमी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
आजच्या काळात 'ब्रह्मचर्य' हा शब्द केवळ संन्यासी किंवा साधूंसाठी मर्यादित मानला जातो. परंतु, वृंदावनचे विख्यात संत प्रेमानंद महाराज सांगतात की, विवाहीत व्यक्ती देखील आपल्या मर्यादेत राहून ब्रह्मचर्याचे पालन करू शकते, ज्याला त्यांनी 'सांसारिक ब्रह्मचर्य' असे म्हटले आहे.
शास्त्रानुसार 'सांसारिक ब्रह्मचर्य' म्हणजे काय?
महाराजांच्या मते, विवाह झाला म्हणजे संयम संपला असा होत नाही. उलट, विवाहाचा उद्देश हा कामवासनेवर नियंत्रण मिळवून तिला शिस्त लावणे हा आहे. प्रेमानंद महाराज सांगतात की:
मर्यादित संबंध: शास्त्रानुसार, एका महिन्यात केवळ एकदाच शरीर संबंधाला अनुमती दिली गेली आहे.
विवाहित ब्रह्मचर्य: जो पुरुष किंवा स्त्री आपल्या विवाहीत जोडीदाराशी निष्ठ राहून केवळ शास्त्राने सांगितलेल्या मर्यादेत राहतात, त्यांनाही 'ब्रह्मचारी'च मानले जाते.
या नियमामागचा उद्देश काय?
महाराज या नियमामागे काही महत्त्वाची कारणे सांगतात:
१. शारीरिक आणि मानसिक शक्तीची बचत: वारंवार कामवासनेच्या आहारी गेल्यामुळे मनुष्याची शारीरिक ऊर्जा (वीर्य शक्ती) क्षीण होते. या ऊर्जेचा वापर अध्यात्म आणि बुद्धीच्या विकासासाठी व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. २. मानसिक शांती: जो मनुष्य वासनेवर नियंत्रण मिळवतो, त्याचे मन शांत आणि एकाग्र राहते. यामुळे संसार करताना देखील ईश्वराचे स्मरण करणे सोपे जाते. ३. चारित्र्य संवर्धन: केवळ विवाहाच्या बंधनात राहूनही जर संयम नसेल, तर मनुष्य पशूसमान होतो. संयम पाळल्याने व्यक्तीमध्ये संयम आणि सुसंस्कृतपणा येतो.
शारीरिक संबंध ठेवण्याची वेळ कोणती?
महाराज सांगतात, पत्नीचा मासिक धर्म अर्थात पाळी येऊन गेल्यावर आठव्या दिवशी शरीर संबंध ठेवणे शास्त्रानुसार योग्य ठरते. यालाच विज्ञानात ओव्ह्युलेशन पिरेड म्हटले जाते. संतती निर्मितीसाठी हा काळ योग्य आहे. संसारी व्यक्तीने संसार वाढवण्यासाठी संबंध ठेवावेत. तो हेतू साध्य झाला असेल तर मनावर, शरीरावर ताबा ठेवणे म्हणजे संसारात राहून कमावलेले ब्रह्मचर्य!
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
गृहस्थाश्रमींसाठी महाराजांचा सल्ला
प्रेमानंद महाराज स्पष्टपणे सांगतात की, जर तुम्हाला संसारात राहून भगवंताची प्राप्ती करायची असेल, तर केवळ पूजा-पाठ करून उपयोग नाही. तुम्हाला तुमच्या इंद्रियांवर ताबा मिळवावा लागेल.
जोडीदाराशी निष्ठा: परस्त्री किंवा परपुरुषाचा विचार करणे हे महापाप आहे.
वासनेचा त्याग: शरीर संबंधाचा मूळ उद्देश हा वंश वाढवणे (संतान प्राप्ती) हा असावा, केवळ भोग विलास नाही.
या आचरणाचे फायदे
महाराजांच्या मते, अशा प्रकारे 'सांसारिक ब्रह्मचर्याचे' पालन केल्यास:
मुलांवर चांगले संस्कार होतात.
पती-पत्नीमधील ओढ आणि प्रेम शारीरिक पातळीवरून आत्मिक पातळीवर पोहोचते.
घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदते.
पाहा महाराजांचा व्हिडिओ -
Web Summary : Premanand Maharaj emphasizes 'marital celibacy,' advocating for limited physical intimacy to conserve energy and foster mental peace. He suggests intercourse post-menstruation for progeny, promoting restraint for spiritual growth and stronger family bonds.
Web Summary : प्रेमानंद महाराज 'वैवाहिक ब्रह्मचर्य' पर जोर देते हैं, ऊर्जा संरक्षण और मानसिक शांति को बढ़ावा देने के लिए सीमित शारीरिक संबंध की वकालत करते हैं। वे संतान के लिए मासिक धर्म के बाद संभोग का सुझाव देते हैं, आध्यात्मिक विकास और मजबूत पारिवारिक बंधन के लिए संयम को बढ़ावा देते हैं।