वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराजांनी जीवनातील दुःख, चिंता आणि भय यावर मात करण्यासाठी अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. त्यांच्या मते, भौतिक सुख-दुःखांवर विजय मिळवून आत्मिक शांती प्राप्त करण्याचा मार्ग भक्तीमध्ये दडलेला आहे. जीवन आनंदी आणि चिंतामुक्त(Stress free life tips by Premanand Maharaj) करण्यासाठी महाराजांनी सांगितलेले हे पाच नियम तुमच्यासाठी मोलाचे ठरतील.
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती!
१. रोज देवाचे 'चरणामृत' घ्या
प्रेमानंद महाराजांनुसार, चरणामृत हे केवळ तीर्थ नाही, तर ते सगळ्या रोगांचा नाश करण्याचे सामर्थ्य ठेवणारे औषध आहे.
रोज सकाळी देवाचे चरणामृत प्राशन केल्यास, ते शरीरातील अनेक रोगांना दूर ठेवते. यामुळे अकाल मृत्यू (Unnatural Death) येत नाही आणि जीवनात भगवंताचे संरक्षण लाभते.
२. 'कृष्णाय वासुदेवाय' चा ११ वेळा जप
जीवनात अपघात किंवा संकटांचे भय नेहमीच असते. हे भय दूर करण्यासाठी महाराज एक शक्तिशाली मंत्र सांगतात. हा मंत्र रोज ११ वेळा म्हणावा-
‘कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।।’
हा श्लोक ११ वेळा म्हटल्याने रस्त्यात किंवा प्रवासात कुठेही अपघात होणार नाही आणि जरी झाले तरी तुमची त्यातून निश्चित सुटका होईल.
३. नित्य २० मिनिटे नामस्मरण करा
मन स्थिर ठेवण्यासाठी आणि चिंतांपासून दूर राहण्यासाठी नामस्मरण हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे. दिवसभरात केवळ २० मिनिटे भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी वेळ काढा. यामुळे मन शांत होते, सकारात्मकता वाढते आणि भौतिक जीवनातील समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
४. रोज ११ दंडवत घाला (मोक्षाचा मार्ग)
महाराज शिस्त आणि नियमांवर जोर देतात. मोक्षाचा मार्ग खुला करण्यासाठी ते दंडवत घालण्याचा नियम सांगतात. रोज देवासमोर ११ दंडवत घालण्याचा नियम (नेम) स्वतःसाठी निश्चित करा. हा नियम पाळल्यास मोक्षाचा मार्ग खुला होतो आणि तुम्हाला पुनर्जन्माच्या चक्रात अडकावे लागत नाही. दंडवत म्हणजे स्वतःला भगवंताच्या चरणी पूर्णपणे समर्पित करणे.
५. देवाची 'चरण धूळ' मस्तकावर लावा
आपल्या देवाच्या चरणांची धूळ (चरण धूळ) मस्तकावर लावल्यास, ते आपल्याला देवाशी थेट जोडते. यामुळे अहंकार (Ego) कमी होतो आणि नम्रता (Humility) वाढते. चरण धूळ मस्तकावर लावल्याने देवाचे आशीर्वाद आणि ऊर्जा दिवसभर तुमच्यासोबत राहते, ज्यामुळे चिंता आपोआप दूर होतात.
प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले हे पाच उपाय केवळ धार्मिक विधी नसून, ते एक जीवन जगण्याची कला शिकवतात. या नियमांमधून साधकाला भगवंताचे संरक्षण, रोगांपासून मुक्ती आणि अंतिमतः पुनर्जन्मातून मुक्ती मिळवून चिंतामुक्त व समाधानी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो. पाहा व्हिडीओ -
Web Summary : Saint Premanand Maharaj suggests five simple remedies for a happy, stress-free life: drink 'Charanamrit', chant 'Krishnaay Vasudevay', meditate for 20 minutes, do 11 'Dandavat', and apply 'Charan Dhool' to your forehead. These practices offer protection, health, and spiritual liberation.
Web Summary : संत प्रेमानंद महाराज ने खुशहाल, तनाव-मुक्त जीवन के लिए पाँच सरल उपाय बताए हैं: 'चरणामृत' पिएं, 'कृष्णाय वासुदेवाय' का जाप करें, 20 मिनट ध्यान करें, 11 'दंडवत' करें, और 'चरण धूल' को माथे पर लगाएं। ये उपाय सुरक्षा, स्वास्थ्य और आध्यात्मिक मुक्ति प्रदान करते हैं।