शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील बहुजनांचे पतीत पावन मंदिर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 07:00 IST

२६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांनी रत्नागिरी येथील पतीत पावन मंदिराची पार्श्वभूमी जाणून घेऊया!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका नेमकी काय होती, हे आजतागायत ना हिंदू समजू शकले, ना हिंदूएतर! ही स्थिती आजचीच नाही, तर ते हयातीत असल्यापासूनची आहे. परंतु, सावरकरांनी कधीच आपल्या भूमिकांबाबत स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवला नाही. ते नेहमी म्हणत, 'माझे विचार पटायला लोकांना वेळ लागेल, पण पटतील हे नक्की!' हा आत्मविश्वास आणि द्रष्टेपण त्यांना प्राप्त झाले, ते त्यांच्या ठायी असलेल्या आध्यात्मिक बैठकीतून!

याच प्रेरणेतून त्यांनी १९३० रोजी रत्नागिरी येथे मुक्कामी असताना बहुजन समाजाला मंदिरात प्रवेश मिळवून दिला होता. भागोजी शेठ किर या सद्गृहस्थांच्या मदतीने या मंदिराची उभारणी झाली. भागोजी शेठ किर यांनी २० गुंठे जमीन विकत घेऊन त्या काळात दीड लाख रुपये खर्चून मंदिराचे काम पूर्ण केले होते. त्या मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश होता. मंदिरातील लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सावरकरांनी किर दाम्पत्यांच्या हातून करवून घेतली. बहुजनांच्या हातून मूर्तीस्थापना करवून घेण्याची ही देशातील पहिली घटना होती. या बातमीची दखल लंडनच्या वृत्तपत्रानेदेखील घेतली होती.  सावरकरांच्या या निर्णयामुळे त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला होता. परंतु, सावरकरांनी लोकांकडे दुर्लक्ष केले आणि मंदिर निर्मितीचे औचित्य साधून बहुजनांसोबत सहभोजन केले होते. 

'तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू' हा नारा देत त्यांनी पतित पावन मंदिराच्या छताखाली सर्व जातिबांधवांना संघटित केले. बहुजनांना केवळ मंदिरात नव्हे तर थेट गाभाऱ्यापर्यंत जाण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतभूमीसाठी आणि भारतीयांसाठी दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगूनही त्यांच्या वाट्याला कायम उपेक्षाच आली. परंतु, त्यांनी याबद्दल कधीच तक्रार केली नाही. त्यांनी आपले कार्य आणि आपला देह देव, देश, धर्मासाठी वाहून घेतला. याच कार्याचा गौरव करण्यासाठी पतित पावन मंदिरात खुद्द लक्ष्मी नारायण त्यांच्या कार्याची साक्ष ठेवून आहेत. आणि काय हवे...?

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरRatnagiriरत्नागिरी