शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

जायभायवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:40 AM

आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे.

ठळक मुद्देपाणीदार गावानंतर शैक्षणिक क्रांतीची सुरुवातशैक्षणिक प्रगतीचा संकल्प

धारुर : ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या जायभायवाडी गावाने पाणी फांडेशनच्या वॉटर कपमध्ये रचनात्मक काम करून पाणीदार गावाची ओळख महाराष्ट्राला करुन दिली. आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून गावातील शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा संकल्प केला.जायभायवाडी हे गाव डोंगरात वसलेले. गावाची ओळख ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून. गावाला जायला धड रस्ताही नव्हता. मात्र, या गावाने श्रमदानाची चळवळ एकजुटीने पाणी फांऊडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतून राज्याला दाखवली व गावाची ओळख पाणीदार गाव म्हणून केली. लोकसहभागातून जायभायवाडीची वेगळी ओळख निर्माण करण्यात ग्रामस्थांना यश आले. केली. हे गाव कायमस्वरुपी दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत आहे.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झाल्याने जायभायवाडीच्या विकासाला दिशा मिळाली. पाणीदार गाव अशी ओळख झालेल्या गावाने शिक्षणाशिवाय गावाची प्रगती होऊ शकत नाही हे लक्षात घेत ऊस तोडीला मजूर जाताना शंभर टक्के मुले गावात थांबवण्यात यश मिळविले. उपसरपंचांनी विकासासाठी पुढाकार घेतला. डॉ. सुंदर जायभायेंनी शाळेकडे लक्ष दिले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून जायभायवाडी येथील जि. प. प्रा. शाळाडिजिटल करण्याचा संकल्प जि. प. चे सीईओ अमोल येडगे व गटशिक्षणाधिकारी गौतम चौपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. दोन्ही वर्ग डिजिटल करण्यात आलेले आहेत. दोन्ही वर्गांमध्ये फरशी बसविण्यात आलेली आहे. मोकळ्या जागेमध्ये फरशी बसविण्यात आलेली असल्याने सकाळी विद्यार्थ्यांना प्रार्थनेवेळी मातीमध्ये बसावे लागतं नाही. शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. याकामी शाळेचे मुख्याध्यापक गव्हाणे व सहशिक्षक गडदे यांनी परिश्रम घेतले. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही शिक्षक स्वत: लक्ष देऊन काम करुन घेत होते. ग्राम परिवर्तक जालिंदर वनवे यांचे सहकार्य मिळाले. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.सोलार पॅनलचा वापरमहाराष्ट्र ग्राम परिवर्तनच्या माध्यमातून १ किलोवॅटचा सोलार पॅनल बसवण्यात आला आहे. यामुळे वीजपुरवठा बंद झाला तरी शाळेचा वीजपुरवठा सुरु राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी रात्रीचे वर्ग चालवणे सोपे जाणार आहे. शाळेसाठी २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली

टॅग्स :BeedबीडSchoolशाळाEducationशिक्षणdigitalडिजिटल