शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शेतीतील अनिश्चिततेमुळे तरूणांचा लोंढा शहराकडे; मिळेल ते काम करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:17 IST

खते, बियाणे, मजुरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर गगनाला भिडलेले असताना शेतीमालाचे दर पूर्णपणे गडगडले आहेत. यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर तरूणपिढीचा भरवसा राहिला नाही.

गंगामसला ( बीड ): उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे पूर्वी जेष्ठ मंडळीकडून ऐकायला मिळत असे. तसेच खेड्याकडे चला हे महात्मा गांधीचे म्हणणे होते. परंतु सध्या खते, बियाणे, मजुरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर गगनाला भिडलेले असताना शेतीमालाचे दर पूर्णपणे गडगडले आहेत. यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर तरूणपिढीचा भरवसा राहिला नाही. अशी स्थितीत ग्रामीण भागात होत असून तरुणांचा मिळेल ते काम करण्याकडे कल वाढला आहे.

एकीकडे रासायनिक खते, बियाणे, औषधे यांच्या दरात होणारी वाढ, शेतीतील नुकसानीमुळे मजुरांना मिळणारी अपुरी मजुरी, तसेच या स्थलांतराने कमी मनुष्यबळामुळे शेतीत मजुरांचा तुटवडा, मधूनच ओढवणारी आस्मानी संकटे, तर दुसरीकडे शेतीच्या मालाची सतत होणारी घसरण यामुळे शेतकऱ्यांचे  व विशेष म्हणजे युवा पिढीचे मनोधैर्य खचत असताना पाहवयास मिळत आहे. म्हणूनच सध्याची युवा पिढी आपली शेती सोडून गावाबाहेर पुणे, नाशिक, मुंबई या ठिकाणी जाऊन मिळेल ते काम अगदी कमी मोबदल्यात करत आहेत. गेल्या काही दिवसात शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने विकला जात आहे. दिवसरात्र उन्हात काबाडकष्ट करून आणलेले पीक बाजारात कवडीमोल भावाने विकले जात आहे. 

भांडवली खर्च सोडाच साधा तोडणीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना  आपली उभी पिके सोडून दिल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. एकूणच सगळ्या बाजूंनी शेतीची पडझड झाल्याने अनिश्चित शेती व्यवसायाकडे युवा पिढी कानाडोळा करून नोकरीला प्राधान्य देत आहे.सरकारची चुकीची धोरणे, शेतीचा वाढता खर्च, निसर्गाचा लहरीपणा व बाजारभावातील तफावत यामुळे शेतीतून निश्चित उत्पादन निघण्याची आशा धूसर होत आहे. याचा परिणाम म्हणून परिसरातील युवा पिढी शेतीकडे कानाडोळा करून नोकरीकडे वळत आहे. असे शेतकरी कामगार पक्षाचे भाई अ‍ॅड. नारायण गोले पाटील यांनी सांगितले.

सेंद्रिय शेती करावी वेळेचे योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व सेंद्रिय शेती केल्यास चांगले पीक घेता येईल. - आर. जे. शेख, कृषी सहाय्यक

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा