यंदा राज्यात सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 01:06 PM2020-01-09T13:06:15+5:302020-01-09T13:07:58+5:30

कापूस पणन महासंघाच्या परळी विभागातील 9 खरेदी केंद्रावर 4 लाख 77 हजार क्विंटल कापसाची खरेदी

This year the highest cotton purchases in the state are in Parli division | यंदा राज्यात सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात

यंदा राज्यात सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा बीड जिल्ह्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. परळी विभागात 9 खरेदी केंद्राचा समावेश

- संजय खाकरे 

परळी : महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या परळी विभागीय कार्यालया अंतर्गत 9 खरेदी केंद्राच्या 27 जिनींगमध्ये मागील तीन महिन्यांपासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.  या केंद्रावर मंगळवारपर्यंत एकूण 4 लाख 77 हजार क्विंटल कापुसाची खरेदी करण्यात आली आहे. राज्यात पणन महासंघाचे एकुण 11 विभागीय कार्यालय आहेत. या 11 विभागापैकी सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात झाली आहे. गेल्या पाच वर्षात परळी विभागात कापूस खरेदी समाधानकारक झालीच नव्हती. यावर्षी मात्र राज्यात विक्रम करणारी कापूस खरेदी परळी विभागात झाली आहे. 

शासकिय कापूस खरेदीचा दर खाजगी खरेदी पेक्षा जास्त असल्याने कापुस उत्पादक शेतकऱ्यांचा कल यावर्षी शासकिय कापूस खरेदी केंद्रावरच दिसून येत आहे. खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी वाहनांची रिघ लागली आहे. परळी विभागात कौडगाव, धर्मापुरी, माजलगाव, मैंदा, साखरे बोरगाव, वडवणी, कुप्पा, भोपा, धारूर, केज, सारूळ, हासेगाव या 9 खरेदी केंद्राचा समावेश आहे. या 9 खरेदी केंद्राअंतर्गत 27 जिनींग असून या जिनींग व खरेदी केंद्रावर 4,77,036 क्विं. कापूस खरेदी झाली असल्याची माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक पी.बी. बुकवाल व उपव्यवस्थापक एस.एस.इंगळे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. 

कापूस खरेदी केंद्रावर 5,350 ते 5,450 रु प्रति क्विं. एवढ्या भावाने खरेदी चालू आहे. कापूस खरेदी केंद्रावर गेल्या 5 वर्षात प्रथमच विक्रमी कापुस विक्रीसाठी आला आहे. राज्यातील 11 पणन महासंघाच्या विभागीय कार्यालयात यंदा सर्वाधिक कापूस खरेदी परळी विभागात झाली आहे. राज्यातील 11 विभागीय कार्यालयाअंतर्गत झालेली कापूस खरेदी क्विंटल मध्ये पुढील प्रमाणे.

नागपुर-29, 500, वणी-4,000, यवतमाळ-1,85,000, अकोल-15,000, अमरावती-33,000, खामगाव-54,000, औरंगाबाद -226000, परभणी-93,000, परळी-4,77,000 नांदेड -23,000, जळगाव-1,93000

यंदा बीड जिल्ह्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात पावसानेही साथ दिली. त्यामुळे कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात आले. परंतू कापूस वेचणीसाठी खर्च शेतकऱ्यांस जास्त आला. त्यामुळे कापसाला ज्यादा भाव मिळाला पाहिजे. शासनाने 8 हजार रूपये क्विंटल दराने कापूस खरेदी करायला हवी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन संघाचे संचालक राजकिशोर मोदी व उपाध्यक्ष ऍड. विष्णुपंत सोळंके यांनी केली आहे.

Web Title: This year the highest cotton purchases in the state are in Parli division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.