धारूर किल्ल्यातील नवीन भिंतींचे काम निष्कृष्ट दर्जाचे; जीव मुठीत घेऊन करावे लागते पर्यटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 01:24 PM2021-08-11T13:24:47+5:302021-08-11T13:28:37+5:30

Dharur Fort News : किल्ल्याच्या दर्शनीय भागातील गड व भिंतीची दुरूस्ती करण्यात आल्याने किल्ल्यात पर्यटक व इतिहास प्रेमींची गर्दी होऊ लागली.

The work of new walls in Dharur fort is not excellent quality; Tourist are scared while visiting | धारूर किल्ल्यातील नवीन भिंतींचे काम निष्कृष्ट दर्जाचे; जीव मुठीत घेऊन करावे लागते पर्यटन

धारूर किल्ल्यातील नवीन भिंतींचे काम निष्कृष्ट दर्जाचे; जीव मुठीत घेऊन करावे लागते पर्यटन

googlenewsNext

धारूर : येथील किल्ला ( Dharur Fort )दुरूस्तीसाठी दोन टप्प्यात सात कोटी रुपयाचा निधी मिळल्यामुळे ऐतिहासिक वास्तुला गतवैभव प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, नविन बांधलेल्या तिन भिंती ढासळल्या, त्या पुन्हा बांधण्यात आल्यानंतर नविन बांधलेली चौथी भिंत पाडून तिचे पुन्हा बांधकाम सध्या सुरू आहे तर नवीन बांधलेल्या पैक्की पाचवी भिंत फुगल्याने धोकादायक झाली आहे. यामुळे अभ्यासक आणि किल्लाप्रेमींना जीव मुठीत घेऊन पर्यटन करावे लागत आहे. ( The work of new walls in Dharur fort is not excellent quality) 

किल्ल्याच्या दर्शनीय भागातील गड व भिंतीची दुरूस्ती करण्यात आल्याने किल्ल्यात पर्यटक व इतिहास प्रेमींची गर्दी होऊ लागली. मात्र, नविन बांधलेल्या दर्शनीय भागातीला तिन भिंती ढासळल्या. या भिंतीची पुनर्बांधणी  शहरातील सामाजीक संघटना व इतिहास प्रेमी यांनी लक्ष दिल्याने सुरु आहे. यादरम्यान, टाकसांळ बुरूजाच्या बाजूची नविन भिंत फुगल्याने ती पाडून पुन्हा बांधण्यात येत आहे. यासोबतच टाकसांळ बुरूजासमोरील नविन बांधलेली भिंतही फुगली असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे किल्ल्यातील नवीन बांधलेली पाचवी भिंत पुन्हा बांधण्याची पाळी येणार आहे. भिंतींचे निष्कृष्ट काम झाल्याने पर्यटक आणि अभ्यासकांना जीव  मुठीत घेऊन चालावे लागत आहे. सातत्याने ढासळणाऱ्या व फुगणाऱ्या भिंतींमुळे पुरात्व विभागाने ( Archaeological Survey of India ) केलेल्या या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत गुत्तेदारास योग्य त्या सुचना देऊन दुरूस्तीचे काम चांगल्या दर्जाचे करावे. किल्ल्यात मागील पाच वर्षात झालेल्या सर्वच कामाची चौकशी स्वतंञ समितीमार्फत करावी अशी मागणी किल्ला अभ्यासक आणि इतिहास प्रेमींमधून होत आहे.

चांगल्या दर्जाचे काम करावे 
दुरूस्तीच्या कामात पुरातत्व विभागाने लक्ष न दिल्याने निष्कृष्ट होत आहे. भिंती ढासळत आहेत. आता तरी दुरूस्तीचे काम दर्जेदार करावे.
- विजय शिनगारे 

दुरुस्तीचे काम चांगल्याच दर्जाचे करणार 
दुरूस्तीचे काम झाल्यानंतर पाच वर्षात देखभाल दुरूस्तीची गुत्तेदाराची जबाबदारी आहे. हे काम चांगल्या दर्जाचे करून घेण्यात येईल. 
- नितीन चारूळे, पुरातत्व विभाग

Web Title: The work of new walls in Dharur fort is not excellent quality; Tourist are scared while visiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.