याप्रकरणी मजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २ मार्चल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमा माणिक भोले (रा. खांडवी ता. गेवराई, ह.मु. टाकरवण पारधी वस्ती) असे मारहाण झालेल्या ऊसतोड मजूर महिलेचे नाव आहे. काम झाल्यानंतर त्या त्यांच्या कोपित जेवणासाठी भाकरी करत होत्या, यावेळी मुकादम सुंदर वक्ते व त्याचा मुलगा आप्पा सुंदर वक्ते (दोन्ही रा. जातेगाव ता. गेवराई) हे आले व ‘तू आताच उसाची गाडी भरण्यासाठी चल, तुला आम्ही पैसे दिलेत’, असे म्हणून रमा यांना शिवीगाळ केली, तसेच आप्पा वक्ते याने त्याच्या हातातील कोयता महिलेच्या डोक्यात मारून जखमी केले. यावेळी भांडणाचा आवाज ऐकून रमा यांचा पती माणिक भोले हे त्याठिकाणी आले, त्यावेळी त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, तसेच जाब विचारला. त्यामुळे त्यांना देखील सुंदर वक्ते याने काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गंभीर जखमी झाल्यामुळे भोले दाम्पत्याने उपचार करून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुकादम व त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सफौ खदीर हे करत आहेत.
महिलेस मुकादमाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:03 IST