शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव पोलिसांच्या गस्तीला बारकोडची साक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 17:19 IST

मागील कांही दिवसांपासुन चोरांनी मांडलेल्या उच्छादावर मात करण्यासाठी शहरात विविध 30 ठिकाणी बारकोड सिस्टीम लावण्यात आली आहे. याद्वारे या भागात पोलीसांची गस्त झाली किंवा नाही हे थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांना कळणार आहे. 

माजलगाव  (बीड ) : मागील कांही दिवसांपासुन चोरांनी मांडलेल्या उच्छादावर मात करण्यासाठी शहरात विविध 30 ठिकाणी बारकोड सिस्टीम लावण्यात आली आहे. याद्वारे या भागात पोलीसांची गस्त झाली किंवा नाही हे थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांना कळणार आहे. 

मागील सहा महिन्यांपासुन माजलगांव शहर व परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या. त्यातील एक दोन चो-यांचे तपास वगळता इतर चोरीच्या घटनांचे तपास लावण्यात पोलीस सपसेल अयशस्वी ठरले. माजलगांव शहरात वाढलेल्या चो-यांचे प्रकार पाहता पोलीस कुठेतरी गस्ती बाबत चुकत आहेत किंवा कामचुकारपणा करीत आहेत अशी शंका उपस्थित होत होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत शहरातील विविध 30 ठिकाणी बारकोड सिस्टीम लावण्यात आल्या आहेत.

रोज रात्री पोलीसांना गस्ती दरम्यान या ठिकाणावर जाऊन या  बारकोडचा फोटो अॅपमार्फत घेवून तो अपलोड करावा लागणार आहे. पोलीसांच्या कामचुकारीवर उपाय म्हणुन ही योजना राबविण्यात आलेली असुन आता पोलीसांना रात्रीची गस्त ही कांही केल्या चुकविता येणार नाही. तसेच गस्त करीत असतांना पोलीसांना वेळेचे भान देखील ठेवावे लागणार आहे. शहरातील मंदीरे, चौक, मुख्य गल्ल्यांमधील महत्वाची घरे आदींसह 30 ठिकाणी सदर बारकोड स्टिकर लावण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षकांमार्फत हा डिजीटल प्रयोग सुरु असला तरी यामुळे शहरातील चो-याचे प्रमाण आटोक्यात आणण्यात पोलीसांना कितपत यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

कार्यक्षमता वाढेल बारकोड सिस्टीमच्या माध्यमातुन शहरातील गस्तीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे गस्तीवर असलेल्या कर्मचा-यांनी कर्तव्यात कसुर केल्याचे लगेच उघड होणार असल्याने पोलीसांची कार्यक्षमता वाढेल. असे असतांनाही एखा़द्या ठिकाणी गस्तपथक गेले नाही व तेथे काही अनुचित प्रकार घडल्यास गस्त पथकातील कर्मचा-यांना जबाबदार धरुन दंड लावण्यात येईल. - विकास दांडे, पोलीस उपनिरीक्षक, शहर पोलीस स्टेशन 

टॅग्स :PoliceपोलिसBeed policeबीड पोलीसdigitalडिजिटलtheftचोरी