शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

रद्दीवाल्याच्या पोटी ज्ञानाचा खजिना ! रद्दीतील वह्या-पुस्तकांवर अभ्यास करत मिळवले अभियांत्रिकीत सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:20 IST

या घरातील लेकीने अभियांत्रिकीच्या विद्युत शाखेतून विद्यापीठातून प्रथम येत सुवर्णपदक मिळविले आहे.

ठळक मुद्देअनुष्का सोनवणेला अभियांत्रिकीचे सुवर्णपदक

- अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई (बीड ) : घरात पाचवीला पुजलेले दारिद्रय.. वडील रद्दी आणि भंगार गोळा करून संसाराचा गाडा हाकतात. तर आई मुकबधीर..घरात शिक्षणाचा कसलाही गंध नाही. अशा अनंत अडचणी बाजूला सरत रद्दीवाल्याच्या घरातील अस्सल सोने लख्ख उजळले आहे. या घरातील लेकीने अभियांत्रिकीच्या विद्युत शाखेतून विद्यापीठातून प्रथम येत सुवर्णपदक मिळविले आहे.

अनुष्का दामोदर सोनवणे असे या गुणवान लेकीचे नाव आहे. बोधीघाट परिसरात राहणारे दामोदर यांना अनुष्का व अमिषा या दोन मुली असून त्यांना मुलगा नाही. काम केले तरच दिवस भागणार अशा अवस्थेत या कुटुंबाने दिवस काढले आहेत. गरिबीमुळे आपल्याला शिक्षण घेता आले नाही याची कसर आपल्या मुलीला शिक्षण देऊन काढण्याच्या हेतूने हे दांपत्य आजही कष्ट घेत आहे. कुटूंबाच्या उदरिनर्वाहासाठी दामोदर यांनी काही काळ सायकल रिक्षा चालवला.

परंतु, त्या काळी बाजारात ऑटोरिक्षा आल्याने त्यांच्या सायकल रिक्षाला प्रवाशी मिळेना झाले. त्यामुळे त्यांनी हातगाड्यावर भंगार व रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांची पत्नी संगीता या मुकबधीर आहेत. त्याही शिलाईकाम करून कुटूंबाला जमेल तेवढा आर्थिक हातभार लावू लागल्या. या सर्व कष्टाच्या पैशातून दामोदर यांनी आपल्या मुलींना शिकवले. अनुष्काचे चौथीपर्यंतचे शिक्षण बोधीघाट येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत झाले. तर, माध्यमिक शिक्षण वेणुताई विद्यालय, बारावीचे योगेश्वरी तर अभियांत्रिकीचे शिक्षण बसवेश्वर महाविद्यालयात झाले.

गरिबीमुळे घरात कोणत्याही सुविधा नसताना व खाजगी शिकवणी लावू न शकलेल्या अनुष्काने पहिलीच्या वर्गापासूनच पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. तीच जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत तिने अभियांत्रिकी परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

रद्दीतील पुस्तकांवर केला अभ्यासअनुष्काचे वडील भंगार व रद्दी खरेदी करीत असताना लोक जुनी पुस्तके आणि अर्धवट वापर केलेल्या वह्या विकत असत. हे ते आपल्या मुलींना दाखवत असत. त्यातून उपयोगी असलेल्या पुस्तक व वह्यांवर अनुष्का व तिची बहीण अभ्यास करीत असत.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद