शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:01 IST

Massajog Sarpanch Bypoll Election 2026: पत्नी अश्विनी देशमुख यांना सरपंच पद देणे हीच संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Massajog Sarpanch Bypoll Election 2026: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

मस्साजोग येथील ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ०७ ते १३ एप्रिल या दरम्यान अर्ज भरले जाणार आहेत. तर १५ एप्रिल रोजी या अर्जांची छाननी केली जाणार आहे. १७ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. तर, २८ एप्रिल रोजी मतदान होऊन निकाल २९ एप्रिल रोजी लागणार आहे. मस्साजोगचा नवा सरपंच कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

अश्विनी देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार 

सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेच गावचा कारभार हाती घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, आता मस्साजोगच्या सरपंचपदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देशमुख कुटुंबीयांनी एकमताने ग्रामस्थांशी चर्चा करून अश्विनी देशमुख यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. अश्विनी देशमुख  आपला उमेदवारी अर्ज अगदी साध्या पद्धतीने दाखल करणार आहेत. 

दरम्यान, नव्याने गावचा कारभार हाती घेणाऱ्या नवीन सरपंचांचा कालावधी १८ महिने इतका असणार आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध सरपंच पद द्यावे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरपंच पद देणे हीच संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता ही निवडणूक बिनविरोध होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Massajog Sarpanch Bypoll: Santosh Deshmukh's Wife Likely Unopposed?

Web Summary : Following Santosh Deshmukh's murder, Massajog faces a sarpanch bypoll. His wife, Ashwini Deshmukh, will file her nomination. Villagers hope for her unopposed election as a tribute to her husband. Election scheduled for April 28.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026BeedबीडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणsarpanchसरपंचBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या