शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? सुरेश धस, लक्ष्मण पवार यांचीही दावेदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:29 IST

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना २०१४ मध्ये भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली होती.

- अनिल लगडबीड : राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची निवड झाली, तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर मंत्रिमंडळात बीड जिल्ह्यातून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना लॉटरी लागणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी जिल्ह्यात मराठा कार्ड म्हणून विधान परिषदेचे भाजपचे आमदार सुरेश धस, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना २०१४ मध्ये भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली होती. भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीतही त्या होत्या. राज्यात मुंडे या ओबीसींच्या भाजपमधील प्रमुख मास लीडर आहेत. त्यांना मंत्रिपदाचा अनुभवही आहे. २०१९ निवडणुकीत मुंडे यांचा परळीतून पराभव झाला. या काळात फडणवीस यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना बीड जिल्ह्यात राजकीय बळ दिले. या कारणामुळे फडणवीस व मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला. यामुळे मुंडे यांच्या पराभवाला फडणवीसदेखील कारणीभूत असल्याची भावना कार्यकर्त्यांत निर्माण झाली होती. यानंतर मुंडे या कोअर कमिटीतून बाहेर पडल्या.

यानंतर त्यांनी भगवान भक्तिगड आणि गोपीनाथ गडावरून पदापेक्षा लोकांमध्ये काम करण्यात रस असल्याचे सांगितले. त्यांना मध्य प्रदेशचे सहप्रभारीपद, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपद मिळाले. राज्यसभा, विधानसभेत संधी मिळेल, अशी अपेक्षा मुंडे समर्थकांना होती; पण तेथेही त्यांना डावलल्याने समर्थकांनी मोठा संताप व्यक्त केला; परंतु त्यांनी मौन बाळगून पक्षाचे काम चालू ठेवले. भाजपच्या बळकटीसाठी मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये मुंडे आघाडीवर दिसल्या. कोअर कमिटीच्या बैठकीसही त्या उपस्थित होत्या.

धस, पवार दावेदारपंकजा मुंडे या विधानसभा, विधान परिषदेच्या सध्या सदस्य नाहीत. यामुळे नव्या मंत्रिमंडळात आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी यापूर्वी राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला. गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या नावाचीही चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. पवार हे दोन वेळा निवडून आले आहेत. यामुळे त्यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेSuresh Dhasसुरेश धसBJPभाजपाBeedबीड