शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळेंचा मस्साजोगमध्ये निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:08 IST

मस्साजोग ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन न करण्याचे आवाहन करत, "तुमचा लढा आम्ही लढू," असा विश्वासही त्यांनी दिला.

मस्साजोग (बीड): मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. अजून एक आरोपी फरार असल्याने देशमुख कुटुंबियांसह गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी दिवंगत सरपंच देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ, आई आदि कुटुंबीयांनी खा. सुळे यांच्यासोबत संवाद साधला. देशमुख यांच्या आईने मारेकऱ्यास माझ्या मुलास जसे मारले तशीच शिक्षा झाली पाहिजे, असे म्हणत हंबरडा फोडला. यामुळे वातावरण सुन्न झाले होते. देशमुख कुटुंबीयांनी हत्येच्या दिवशीच संपूर्ण घटनाक्रम खा. सुळे यांना सांगत एक आरोपी अद्यापही फरार असल्याबाबत संताप व्यक्त केला.

देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी इथे भाषण करायला आलेली नाही. मी फक्त या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले आहे. वैभवी कोणाची तरी लेक आहे, मीही कोणाची तरी लेक आहे. आपल्या मूलाचे निधन आईसाठी सर्वांत मोठं दु:ख आहे. मी यापूर्वी माझ्या मावशीच्या मुलाला लहान वयात गमावलं आहे. त्या घटनेला २०-२५ वर्षे झाली असली तरी माझी मावशी आजही सावरू शकलेली नाही."

"माणुसकीच्या नात्याने हा लढा लढणार"सुप्रिया सुळे यांनी यावेळी भावनिक होऊन सांगितले की, "या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढा देणार आहे. कोण जबाबदारी घेतो किंवा घेत नाही, याची मला पर्वा नाही. माणुसकीच्या नात्याने हा लढा मी थांबवणार नाही." यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागरही उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि न्याय मागेलसुळे पुढे म्हणाल्या, "माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या प्रकरणात आठ दिवसांत न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी महाराष्ट्रातील महिला म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि न्याय मागेल." देशमुख हत्येप्रकरणात न्याय न मिळाल्यास सत्तेचा उपयोग काय, असा सवाल करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सत्याचाच विजय झाला पाहिजे. सत्तेची आणि पैशांची मस्ती उतरलीच पाहिजे.मी कोणाशीही तडजोड करणार नाही." असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप नेते सुरेश धस यांना टोला लगावला.

"न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही"बीड जिल्ह्याचा अभिमान आम्हाला आहे, पण काही लोकांनी जिल्ह्याचे नाव बदनाम केले आहे. आता महिलांनी पुढे येऊन लढा द्यावा, आवश्यकता पडल्यास लाटणं हाती घ्यावं, असे आवाहन सुळे यांनी केले. तसेच, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे ठाम आश्वासनही त्यांनी दिले. या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचेही सुळे यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन न करण्याचे आवाहन करत, "तुमचा लढा आम्ही लढू," असा विश्वासही त्यांनी दिला.

टॅग्स :Beedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीSupriya Suleसुप्रिया सुळे