शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विजयसिंहांसारख्या तरुणांच्या हातात सत्ता देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:09 IST

बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या कार्यकाळात विजयसिंह पंडित यांनी अध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली.

ठळक मुद्देशरद पवार । गेवराईच्या सभेत आवाहन; सत्तेचा वापर विकासासाठी करणार

गेवराई : बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या कार्यकाळात विजयसिंह पंडित यांनी अध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली. जिल्ह्याचे हित जपण्याचे महत्वपूर्ण काम केले, राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले अध्यक्षपद त्यांनी यशस्वी आणि दैदिप्यमान काम करुन लोककल्याणाचा वसा जपला. तालुक्याच्या विकासासाठी त्यांना सत्तेचा वापर करायचा आहे, ते पदासाठी नव्हे तर जनतेच्या भल्यासाठी विकास योजना राबविण्यासाठी लढत आहेत, अशा विजयसिंह सारख्या युवकांच्या हातात मला महाराष्ट्राची सत्ता देवुन यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी विजयसिंह पंडित यांना हजारोंच्या मताने विधानसभेत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मतदारांना केले.गेवराई मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेच्या व्यासपीठावर शरद पवार, माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी. आ.अमरसिंह पंडित, उमेदवार विजयसिंह पंडित, माजी आ. उषा दराडे आदि उपस्थित होते.आमदारकी शब्द लावुन मला मिरवायचे नाही तर या गेवराई तालुक्यातील लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी आणि तरुणांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी मला आशिर्वाद द्या, असे आवाहन यावेळी बोलतांना विजयसिंह पंडित यांनी केले.यावेळी विजयसिंह म्हणाले, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्याच्या सिंदफणा खोऱ्यात साखळी बंधारे बांधणे, गेवराई एमआयडीसीचा प्रश्न सोडवणे, सोलापूर - जळगांव रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणे यासाठी सेवा करण्याची संधी द्या. विद्यमान प्रतिनिधीनीं लोकांना गृहीत धरुन सत्ता मिळविली. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, चुकीच्या आणेवारीमुळे शेतक-यांना पिकविमा यापुढे मिळणार नाही. आता त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. मला संधी द्या, तुम्हाला कधीही नाऊमेद होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडSharad Pawarशरद पवार