शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पत्नी, एका मुलाला बॅटने मारले, दुसऱ्या मुलास पाण्यात बुडवले; निर्दयी पित्याला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:00 IST

चारित्र्यावर संशयाने पत्नीसह दोन मुलांचा खून, निर्दयी पित्याला फाशीची शिक्षा; बीडमधील घटनेट प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा महत्त्वपूर्ण निकाल

बीड : चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह दोन मुलांचा खून केला. कोरोना काळात लॉकडाऊन असताना २०२० मध्ये बीड शहरातील पेठबीड भागात ही घटना घडली होती. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने गुरुवारी दिला. यात निर्दयी पित्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. आनंद एल. यावलकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

संतोष जयदत्त कोकणे (रा. तकवा काॅलनी, शुक्रवार पेठ, बीड) असे आराेपीचे नाव आहे. तर संगीता संतोष कोकणे (वय ३५), सिद्धेश संतोष कोकणे (वय १०) व कल्पेश संतोष कोकणे (वय ८) अशी मयतांची नावे आहेत. २४ मे २०२० रोजी शुक्रवार पेठ येथील राहत्या घरी पहाटे चार वाजेच्या सुमारास संतोष कोकणे याने संगीता हिचा अनैतिक संबंधाच्या संशयाच्या कारणावरून डोक्यात लाकडी बॅट व दगडाने गंभीर दुखापत करून खून केला होता. त्यानंतर दुसरा मुलगा कल्पेश याच्याही डोक्यात बॅट मारून त्यास बेशुद्ध केले. त्यानंतर पाण्याच्या बॅरेलमध्ये बुडवून मारले होते. या घटनेने जिल्हा हादरला होता. याप्रकरणी आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून पेठबीड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती, हवालदार सुनील अलगट आदींनी केला. त्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सदरील प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग झाले होते. या प्रकरणाचा साक्षीपुरावा व सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. आनंद एल. यावलकर यांच्या समोर झाली. यात सर्व बाजू तपासून न्या. यावलकर यांनी आरोपी संतोष याला कलम ३०२ प्रमाणे दोषी धरून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील भागवत एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा शासकीय अभियोक्ता व इतर सर्व अति. सहा. सरकारी वकील यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार माधव नागमवाड व उपनिरीक्षक बी. बी. जायभाय यांनी मदत केली.

१५ साक्षीदार तपासलेसदर प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. यात संगीताचे ज्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्याची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच संतोषच्या भावाचा जबाब, इतर साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांचा अहवाल यांचे अवलोकन आणि सहा. सरकारी वकील भागवत एस. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. सदरचे प्रकरण हे दुर्मीळातील दुर्मीळ असून आरोपीस फाशी देणे इतपत गंभीर आहे, हा युक्तिवाद ग्राह्य धरून संतोष कोकणे याला फाशीची शिक्षा सुनावली.

आत्याकडे गेल्यामुळे तिसरा मुलगा वाचलाघटनेच्या दिवशी संतोष व त्याची पत्नी संगीता यांच्यात टोकाचे वाद झाले. त्यामुळे संतोष हा त्याच्या बहिणीच्या घरी मयूर या मोठ्या मुलाला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यांनी जेवण करून झोपले व पहाटेच्या दरम्यान संतोष याने घरी जाऊन पत्नी संगीता हिचा खून केला. याचवेळी सिद्धेश व कल्पेश जागे झाले, त्यामुळे त्यांनाही संपवले. मयूर हा आत्याकडे असल्यामुळे वाचला होता. सध्या तो आजीकडे राहत आहे.

खून करून पोलिस ठाण्यासमोर उभापत्नीसह दोन मुलांचा खून केल्यानंतर संतोष हा बहिणीकडे गेला. तेथे नाश्ता केला. बहिणीने विचारल्यावर बाहेर फिरायला गेलो आणि तसेच तुझ्याकडे आलो, असे सांगितले. नाश्ता झाल्यावर तो पेठबीड पोलिस ठाण्यासमोर जाऊन उभा राहिला. तोपर्यंत संतोषच्या भावाने घटनास्थळाची पाहणी केल्यावर तो घाबरून पेठबीड पोलिस ठाण्याकडे आला. यावेळी त्याला संतोष हा बाहेर उभा दिसला. त्याला विचारल्यावर सर्व घटनाक्रम सांगितला. मग त्याला भावानेच पोलिसांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड