शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीसाठी पत्नीला पाजले विष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:28 IST

अवघे वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणत सासरच्या लोकांनी छळ केला. पैसे देऊनही नंतर दुचाकीसाठी पैसे आणण्याचा तगादा लावून तिला डास मारण्याचे द्रव पाजल्याची खळबळजनक घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात बुधवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देपतीसह सहा जणांवर गुन्हा : वर्षभरापूर्वीच झाले लग्न

बीड : अवघे वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणत सासरच्या लोकांनी छळ केला. पैसे देऊनही नंतर दुचाकीसाठी पैसे आणण्याचा तगादा लावून तिला डास मारण्याचे द्रव पाजल्याची खळबळजनक घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.क्रांती नितीन मुंडे (वय २५) असे त्या विवाहितेचे नाव आहे. बीडच्या क्रांतीचे लग्न मागील वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील पवारवाडी येथील नितीन अभिमन्यू मुंडे याच्यासोबत झाले होते. सुरुवातीचे तीन महिने चांगले गेल्यानंतर नितीनने गाडी घेण्यासाठी माहेरहून चार लाख रूपये आणण्यासाठी क्रांतीकडे तगादा लावला. त्यावेळी क्रांतीच्या वडिलांनी भूखंड विकून तिला चार लाख रुपये दिले. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने नितीन आणि क्रांती पुण्याला गेले. तिथे पैसे कमी पडू लागल्याने नितीनने पुन्हा एक लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी करत क्रांतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. त्यामुळे क्रांतीच्या वडिलांनी पुन्हा ५० हजार रुपये दिले. त्यानंतर नितीनच्या मेहुण्यासाठी गाडी घेण्याकरिता ५० हजार रुपये आण म्हणून क्रांतीचा सासरी पुन्हा छळ सुरु झाला. तिला मारहाण करून उपाशी ठेवण्यात येऊ लागले. सततच्या छळास कंटाळून क्रांतीला तिचे आई-वडील डिसेंबर महिन्यात माहेरी बीडला घेऊन आले. काल बुधवारी क्रांतीचा पती, सासरा, दीर हे बीडला क्रांतीच्या माहेरी आले. यावेळी नितीनने बोलण्याच्या बहाण्याने क्रांतीला एका खोली नेऊन तिला डास मारण्याचे द्रव बळजबरीने पाजले आणि सर्व जण पळून गेले असे क्रांतीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे. अत्यवस्थ अवस्थेतील क्रांतीवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.क्रांतीच्या जबाबावरून तिचा पती नितीन मुंडे, सासरा अभिमन्यू, दीर सचिन, नणंद कल्पना दत्तात्रय बांगर, नणंदेचा पती दत्तात्रय बांगर आणि सासऱ्याचा भाऊ दशरथ बांगर या सहा जणांवर शिवाजीनगर पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी