शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

वाळूमाफियांवर चोरीचे  गुन्हे का दाखल केले नाहीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 2:33 PM

महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यासाठी नोटिसा जारी

ठळक मुद्देबीडमध्ये वाळूमाफियांवर वर्षभरात ३२५ कारवाया

बीड : गेवराई तालुक्यातील राजापूर येथे २२०० पेक्षा अधिक ब्रास वाळूसाठ्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी धाड टाकत मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली आहे. त्यानंतर या विभागाशी संबंधित सर्व महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यासाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत, तर वाळूतस्करीच्या प्रकरणात चोरीचे गुन्हे दाखल का केले नाहीत, अशी विचारणा महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली आहे.  मात्र, या मागील वर्षभरात ३२५ वाळूमाफियांवर कारवाई केली असली, तरी यापैकी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच फक्त दोघांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून वाळूमाफिया आणि महसूल व पोलीस प्रशासनातील साटेलोटे दिसून येत आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर अवैध वाळू उपसा व वाहतूक हा विषय जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अजेंड्यावर आहे. बीड जिल्ह्यात वाळूचा धंदा हा सर्वाधिक फायद्याचा धंदा ठरलेला असल्याने या धंद्याची मोठी साखळी सक्रिय आहे. यात राजकीय पुढारी, कार्यकर्ते, पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजापूर येथील हजारो ब्रास वाळुसाठा जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. वाळू माफियांवर मकोकानुसार (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई करणे, एमपीडीएचे अस्त्र वापरणे या ऐवजी पोलीस आणि महसुलचा भर केवळ दंड वसुलीवर राहिला आहे. त्यातही दंड आकारण्याचा अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना आणि किती वाळू पकडली हे पोलीस कळवणार, क्वचित काही ठिकाणी अत्याधुनिक तंत्राद्वारे मोजणी करण्यात येत होती. नाहीतर बहुतांश ठिकाणी अर्थपूर्ण व्यवहारामुळे दंडात्मक कारवायांना देखील फाटा दिला जात होता. राजापूर वाळू प्रकरणानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे अधिकारी व पोलीस प्रशासनाातील संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्व लक्ष लागले आहे. 

मारहाण झाली म्हणून गुन्हे दाखल केलेज्या प्रकरणामध्ये थेट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाळूमाफियांनी मारहाण केली. त्यामध्येच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि १७ गुन्हे दाखल झाल्यानंतरही अटक आरोपींची संख्या मात्र केवळ २ आहे. दंडवसुली मात्र, ४ कोटी ८६ लाखाची करीत मराठवाड्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. इतका दंड भरून तस्करांनी गोदावरी, सिंदफनेसह अनेक नद्यांची चाळणी करून कितीतरी कोटी रुपयांची मालमत्ता कमावली आणि पर्यावरणाचा ऱ्हास केला याचे मात्र कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :sandवाळूBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCrime Newsगुन्हेगारीArrestअटक