शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

‘कोण रे तू ? कशाला आलास? थोबाडीत देईन!’; सुदाम मुंडेची अरेरावी अन् शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:32 IST

परळीपासून जवळच असलेल्या रामनगर परिसरात सुदामने बेकायदेशीरपणे रुग्णालय सुरू केले होते.

ठळक मुद्देझोपेतून उठवताच सुदाम मुंडे पथकावर भडकलाकारवाईसाठी अधिकाऱ्यांचे रात्रभर जागरण

- सोमनाथ खताळ

बीड : परळीतील गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे हा त्याच्याच रुग्णालयातील एका खोलीत झोपलेला होता. पथकाने त्याला उठवीत ओळख दिली. यावर सुदाम चांगलाच भडकला. ‘कोण रे तू? कशाला आलास? थोबाडीतच देईन’, असे म्हणत तो पथकावर भडकला.

परळीपासून जवळच असलेल्या रामनगर परिसरात सुदामने बेकायदेशीरपणे रुग्णालय सुरू केले होते. त्याच्यावर छापा टाकण्यासाठी आरोग्य, महसूल, पोलीसांचे पथक शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तेथे पोहचले. त्यावेळी सुदाम रुग्णालयातीलच एका खोलीत गाढ झोपलेला होता. पथकाने खोलीत जाऊन त्याला उठविले. यावर त्याने कोण रे तू?, असा प्रश्न विचारला. पथकाने ओळख देताच कशाला आलास?, असा  उलट प्रश्न विचारला.

यावर पथकाने आपल्या तक्रारी आहेत असे सांगितले. लेखी तक्रार आहे का? थोबाडीतच देईन, असे म्हणत पथकातील अधिकाऱ्यांसोबत अरेरावी केली. तसेच एका अधिकाऱ्याला बघुन घेतो, असे धमकीही दिली. रात्री ९ वाजता सुरू झालेली कारवाई पहाटे संपल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईबद्दल प्रचंड गोपनियता पाळण्यात आली होती. मोजक्याच तीन अधिकाऱ्यांशिवाय कोणालाच याची माहिती न देता फौजफाटा रामनगरच्या दिशेने रवाना झाला होता. तत्पूर्वी कारवाईत सहभागी सर्वांचे मोबाईल काढून घेण्यात आले होते. या दरम्यान अनेक पोलिसांकडे शस्त्र होते. 

‘माझ्या नादी लागू नको, महागात पडेल’१५ दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील एक अधिकारी रुग्णालयात खात्री करण्यासाठी गेले. यावर त्याने माझी तक्रार दाखव. तू आलासच कसा? असा दम दिला. मी जामिनावर आहे. मी प्रॅक्टिस करीत आहे, याचा पुरावा दाखव. गुपचूप निघायचे, नाहीतर मला ब्लॅकमेल करीत आहेस, म्हणून तुझ्यावरच केस करील, अशी धमकी त्याने दिली होती. तसेच माझ्या नादी लागू नकोस, नाहीतर महागात पडेल, असा दमही या अधिकाऱ्याला सुदामने दिला होता.  

‘रजिस्ट्रेशनची माहिती तुम्हीच घ्या!’पथकाने सुदामकडे रुग्णालयाची नोंदणी मागितली. यावर त्याने आपण रजिस्ट्रेशन मागितले होते. दिले की नाही, हे तुम्हीच तपासा. माझे फक्त मागणी करण्याचे काम आहे.  जास्त बोलायचे नाही. नाहीतर थोबाडीत देईन, असे म्हणत धमकी दिली. पथकाची रात्रभर कारवाई सुरू असताना मुंडेचा हा गोंधळ सुरूच होता.

तीन दिवसांपासून कारवाईचे नियोजनपरळीतील गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर आल्यानंतरही परळीपासून जवळच असलेल्या रामनगर परिसरात दवाखाना सुरू केला. तेथे स्वत:च्या नावाचा बोर्डही लावला. रुग्णांवर उपचारही सुरू केले. याची माहिती आरोग्य विभागाला तीन महिन्यांपूर्वी मिळाली होती; पण तक्रार येत नव्हती. पंधरा दिवसांपूर्वी याची खात्री केली आणि तीन दिवसांपूर्वी कारवाईचे नियोजन झाले.  मोजक्या तीन अधिकाऱ्यांशिवाय कोणालाच याची माहिती न देता फौजफाटा रुग्णालयस्थळी धडकला.  

गर्भपाताचे दुकान २०१०-२०१२ या काळात गर्भपातासाठी लागणाऱ्या विक्रीडिल या औषधींच्या व्हाईल्सची जेवढी जिल्ह्यात मागणी आणि विक्री असे, त्यातली ७० टक्के मागणी आणि उपयोग एकट्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात होत असे.

टॅग्स :raidधाडdoctorडॉक्टरBeedबीड