शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:05 IST

नऊ लाचखोरांचे प्रस्ताव चार वर्षांपासून प्रलंबित

- सोमनाथ खताळ

बीड : नियमात होणाऱ्या कामांसाठीही पैसे घेऊन कोट्यवधींची माया जमवली. राज्यातील अशाच नऊ लाचखोरांवर अपसंपदा आणि भ्रष्टाचार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. त्यांची चौकशी होऊन मालमत्ता गोठविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाला प्रस्तावही पाठविले. परंतू चार वर्षांपासून ते धूळखात पडून असल्याचे समोर आले आहे. गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे. विशेष म्हणजे स्मरणपत्रही दिले. परंतु अद्यापही त्यांच्या मालमत्ता गोठविण्यासंदर्भात काहीच उपाययोजना केल्या नाहीत.

कोणाचा प्रस्ताव कधीपासून प्रलंबित?१. परिवहन विभागआरोपी : श्यामराव महादेव शेटे (वय ५४, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी) आणि शमिष्ठा श्यामराव शेटे (पत्नी, वय ५०)रक्कम: ४७,६९,७७४गुन्हा दाखल : ११-०१-२०१९अहवाल पाठविला : ०१-१०-२०२१

२. उद्योग, उर्जा व कामगार विभागआरोपी: मोहन जगदेवराव धोत्रे (सेवानिवृत्त कामगार कल्याण आयुक्त, मुंबई) आणि स्वाती मोहन धोत्रे (पत्नी), योगेश मोहन धोत्रे (मुलगा)रक्कम : २,१४,३२,४०८गुन्हा दाखल : २८-११-२०१४अहवाल पाठविला : ११-०४-२०२५

३. नगर विकास विभागआरोपी : सुभाष दिगंबर जगताप (नगरसेवक, पुणे) आणि उषा सुभाष जगताप (नगसेविका, पुणे)रक्कम : १,३२,२४,६९१गुन्हा दाखल : ०४-०३-२०१५अहवाल पाठविला : १०-०९-२०२१

आरोपी: लता प्रकाश गायकवाड (सेवानिवृत्त जकात निरीक्षक, मुंबई), सोनाली समीर तांबे (खासगी व्यक्ती)रक्कम : १२,३२,०००गुन्हा दाखल : २९-०१-२०१९अहवाल पाठविला : १६-०३-२०२३

आरोपी: गुलकंद अविनाश दळवी (जकात निरीक्षक, मुंबई)रक्कम : १,१८,१८,०३९गुन्हा दाखल : ०७-०४-२०१६अहवाल पाठविला : २०-०६-२०२३

आरोपी : किशोर हरी नाईक (स्वच्छता निरीक्षक, मुंबई), आर्यशी किशोर नाईक (पत्नी)रक्कम : ५०,३८,५१३गुन्हा दाखल : २९-०९-२०१६अहवाल पाठविला : २९-०८-२०२३

४. कृषी व पदुम विभागआरोपी : श्रीधर साहेबराव सर्जे (कृषी अधिकारी, परभणी), ज्योती श्रीधर सर्जे (पत्नी)रक्कम : १२,७७,२६७गुन्हा दाखल : ३१-१२-२००८अहवाल पाठविला : १४-०६-२०२३

५. जलसंपदा विभागआरोपी : बाळासाहेब भाऊसाहेब पाटील (सेवानिवृत्त मुख्य अभियंता, कोकण पाटबंधारे विभाग, मुंबई)रक्कम : २,८२,५२,०००गुन्हा दाखल : २३-०६-२०१६अहवाल पाठविला : ०८-०४-२०२२

६. सार्वजनिक बांधकाम विभागआरोपी : गजानन शंकर खाडे (तत्कालीन कार्यकारी अभियंता, छत्रपती संभाजीनगर), अमोल गजानन खाडे (मुलगा)रक्कम : २,४८,८१,४६९गुन्हा दाखल : १८-०६-२०१४अहवाल पाठविला : २०-०७-२०२१

अशी आहे आकडेवारीखाते - प्रकरणे - रक्कमनगरविकास विभाग - ४ - ३,१३,१३,२४३परिवहन विभाग - १ - ४७,६९,७७४कृषी व पदुम - १ - १२,७७,२६७जलसंपदा - १ - २,८२,५२,०००उद्योग विभाग - १ - २,१४,३२,४०८सा. बां. विभाग - १ - २,४८,८१,४६९एकूण - ९ - ११,१९,२६,१६१

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeedबीड